मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /जगातील सर्वोत्कृष्ट वेब सीरिज कुठली? IMDB च्या रेटिंगनुसार या आहेत OTT वरच्या टॉप 5 मालिका

जगातील सर्वोत्कृष्ट वेब सीरिज कुठली? IMDB च्या रेटिंगनुसार या आहेत OTT वरच्या टॉप 5 मालिका

web series

web series

कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून, OTT प्लॅटफॉर्मवरच्या वेबसीरिजला सुगीचे दिवस आले आहेत. IMDB ( Internet Movie Database ) वर टॉप रँकिंग कुठल्या Web series ला मिळालंय पाहा.. यातल्या किती तुम्ही पाहिल्यात?

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी: कोरोनाच्या काळात (Coronavirus Pandemic) जेव्हा चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होणं बंद झालं तेव्हा OTT प्लॅटफॉर्म हा प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा मोठा आधार बनला. ह्या काळात बराच प्रेक्षक वर्ग हा OTT कडे वळाला आणि त्यावरून जगभरातल्या वेब सीरीज, मालिका, चित्रपट ह्यांचा आनंद घेऊ लागला. भारतात सुद्धा अशा वेब सीरीज (web series) तयार होऊ लागल्या आणि त्यांना सुद्धा IMDB रेटींग मिळालेलं आहे. IMDB रेटींग अनुसार जगभरातील सर्वोत्कृष्ट वेब सीरीज कुठल्या ते खाली पाहा..

1) Breaking Bad: 'ब्रेकिंग बॅड' ही वेब सीरीज NETFLIX वर 2008 मध्ये प्रदर्शित झाली होती. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या एका हायस्कूल शिक्षकाची ही कहाणी आहे. तो अंमली पदार्थांचा व्यवसाय थांबविण्यासाठी बाहेर पडतो, परंतु स्वतःच या धंद्यात गुंततो. चित्रपटात ब्रायन क्रॅनेस्टोनने वॉल्टरची भूमिका साकारली आहे. ब्रयान क्रेनस्टोन, ऐरॉन पॉल, एना गन, डीन नोरिस ह्यांनी ह्यात खूप उत्कृष्ट भूमिका साकारलेल्या आहेत.

2) Chernobyl: 2019 मध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम वर प्रदर्शित झालेल्या 'चेर्नोबिल' या वेब सीरीजमध्ये चेर्नोबिल शहरातल्या अणुप्रकल्प अपघाताचं चित्र रंगवण्यात आलं आहे. या वेब सिरीजमध्ये मानवी विनाशाचे भयानक दृश्य अतिशय चांगले दर्शविले गेलं आहे. IMDB कडून ह्या वेब सिरीजला 9.4 रेटींग मिळालेलं आहे. जस्सी बक्ले, जारेड हॅरिस, स्टेलान स्कर्गार्ड, अ‍ॅडम नागायटीस यांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

3) Sherlock: 2010 मध्ये नेटफ्लिक्सवर 'शेरलॉक' ही वेब सीरीज प्रसिद्ध झाली. आतापर्यंत त्याचे 3 सर्वोत्कृष्ट सीजन आले आहेत. या वेब सिरीजमध्ये लंडनच्या लोकप्रिय गुप्तहेर शेरलॉक होमची कहाणी दाखविली आहे. शेरलॉक डॉक्टरांच्या मदतीने एक अतिशय कठीण केस सोडवण्यात यशस्वी ठरतो. ही वेब सीरीज खूपच रोमांचक बनवण्यात आली आहे. बेनेडिक्ट कंबरबेज, मार्टिन फ्रीमॅन, ऊना स्टब्ब्स यांच्या व्यतिरिक्त रुपर्ट ग्रेव्ह यांनीही यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या गुन्हेगारी मालिकेचा शेवटचा सीजन 2017 मध्ये आला होता. या वेब सीरीजला 9.1 IMDB रेटींग मिळालेलं आहे.

4) Flames: 'फ्लेम्स' ही एक भारतीय वेब सीरीज आहे. या हृदयस्पर्शी वेब सीरीजला ‘मिर्जापूर’ आणि ‘सेक्रेड गेम्स’ पेक्षा देखील जास्त रेटिंग मिळाली आहे. IMDB ने ह्या वेब सीरीजला 9.1 रेटिंग दिले आहे. ह्याची कथा ही किशोरवयीन प्रेमावर आधारित आहे. पचकू रजत त्याच्या शिकवणीत त्याच्याबरोबर शिकणार्‍या मुलीच्या प्रेमात पडतो. ही वेब सीरीज MX Player आणि TVF वर सुद्धा प्रदर्शित करण्यात आली असून त्यामध्ये रित्विक सहोरे, तान्या मानिकतला, सोनाक्षी ग्रोवर, शिवम कक्कड़यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

5) Kota Factory: ही वेब सीरीज 2019 मध्ये TVF Play वर रिलीज झाली होती. IMDB ने हिला 9 रेटिंग दिलं आहे.  ही भारताची पहिली ब्लॅक अँड व्हाईट वेब सिरीज आहे. 'कोटा फॅक्टरी' ही वेब सीरीज वैभव या 16 वर्षाच्या मुलाची कथा सांगते, जो IIT आणि JEE च्या  तयारीसाठी इटारसीहून कोटा येथे आला आहे. येथे तयारीसाठी येणाऱ्यांना किती त्रास सहन करावा लागतो हे त्याला तिथे येऊन समजते. ह्या वेब सीरीज मध्ये मयूर मोरे, जितेंद्र कुमार, रंजन राज, रेवती पिल्लई यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

First published:

Tags: Netflix, OTT, Web series