मुंबई, 10 सप्टेंबर: आजकाल तरुण-तरुणी सडपातळ दिसण्यासाठी काहीही करायला तयार असतात. कोणीतरी जिममध्ये तासन्तास घाम गाळतो. तर कोणी आहाराचे कडक नियम पाळण्यात व्यग्र असतो. एवढेच नाही तर अनेक लोक स्वतःला सडपातळ आणि तंदुरुस्त करण्यासाठी विविध उत्पादने आणि औषधांची मदत घेत आहेत. मात्र, या गोष्टींचे अनेक दुष्परिणाम आहेत जे हळूहळू समोर येतात. सडपातळ आणि तंदुरुस्त दिसण्यासाठी योग्य आहार आणि दररोज थोडा व्यायाम करणं गरजेचं आहे. विनोदी कलाकार भारती सिंगने (Bharti Singh Weight Loss Transformation) आहार आणि व्यायामाद्वारे बरेच वजन कमी केलं आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवर तिनं काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये तिच्या कमी होणाऱ्या वजनाची झलक पाहायला मिळते.
भारतीने 15 किलो वजन घटवलं
आपल्या जबरदस्त कॉमिक टायमिंगने सर्वांना हसवणारी कॉमेडियन भारती सिंह आजकाल तिच्या घटत्या वजनामुळे चर्चेत आहे. भारती सिंगनं जवळपास एका वर्षात 15 किलो वजन कमी केलं आहे. पूर्वी भारतीचे वजन सुमारे 91 किलो होते परंतु आता 76 किलो झाले आहे. तिच्या कमी होत असलेल्या वजनावर भारती सिंह म्हणते की 'मी स्वत: च आश्चर्यचकित झालो आहे की, मी इतके वजन कमी केलं आहे'. 'पण मी तितकीच आनंदी आहे, कारण मला आता निरोगी आणि तंदुरुस्त वाटतंय. सध्या दम लागत नाही आणि अंग हलकं वाटतंय. तसेच आता मधुमेह आणि दम्यातून सुटका मिळाली. 'भारती म्हणते की' जर तुम्ही स्वतःवर प्रेम केले नाही तर कोणीही तुमच्यावर प्रेम करणार नाही.
हे वाचा - भारती सिंगच नाही तर 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटींनीही घटवलं प्रचंड वजन, पाहा कोण आहे
भारतीच्या फिटनेसचे हे रहस्य (Bharti Singh Weight loss diet)
भारती सिंहच्या या फिटनेसचे रहस्य वेळच्या वेळी आहार घेणे हे आहे. ती रात्री 7 च्या आधी जेवण घेते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12 पर्यंत काही खात नाही. भारती रोज व्यायाम करते. ती म्हणते की माझे शरीर संध्याकाळी 7 नंतर रात्रीचे जेवण स्वीकारत नाही. मी 30-32 वर्षांपर्यंत भरपूर काही खाल्लं आहे, परंतु लॉकडाऊन दरम्यान आहाराचे पालन केलं आहे. ती म्हणते पूर्वी लोक मला क्यूट चिबी म्हणत असत, कारण ते उघडपणे मला जाड म्हणू शकत नव्हते. पण आता जेव्हा लोक कमी वजनामुळे तंदुरुस्त आणि सुंदर म्हणून स्तुती करतात तेव्हा बरं वाटतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Comedian, Comedy actor