मुंबई, 05 ऑक्टोबर : सिनेजगत आणि क्रिकेट यांचं नातं खरं तर आता कोणालाच नवं नाही. या दोन्ही क्षेत्रातील स्टार्सची नावं अनेकदा एकमेकांशी जोडली गेली आहेत. अझरुद्दीन आणि संगीता बिजलानी पासून ते विराट-अनुष्का पर्यंत अनेकांच्या नावाचा समावेश या यादीत केला जातो. अशातच अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी ही क्रिकेटर केएल राहुलला डेट करत असल्याच्या चर्चा मागच्या काही काळापासून सुरू आहेत. राहुलनं एका मुलाखतीत या सर्व अफवा असल्याचं म्हटलं होतं मात्र काल रात्री पुन्हा एकदा एकत्र स्पॉट केलं गेलं. अथिया शेट्टी आणि केएल राहुलचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये एकीकडे अथिया ब्लॅक ब्लेझर आणि व्हाइट क्रॉप टॉपमध्ये सुंदर दिसत होती तर दुसरीकडे राहुलचा व्हाइट टी-शर्ट आणि डेनिम जॅकेटमध्ये कूल लुक पाहायला मिळाला. हे दोघंही एकाच कारमधून आले होते. मागच्या काही दिवसांपासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत. मात्र एका मुलाखतीत याविषयी विचारण्यात आलं असता राहुलनं या फक्त अफवा असल्याचं म्हटलं होतं. Navratri 2019 : गरबा फेम फाल्गुनी पाठकच्या गाण्यांवर थिरकली देसी गर्ल प्रियांका
काही दिवसांपूर्वी अथियानं सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टवर एका फॅशन डिझायनर केलेल्या कमेंटमुळे अथियाचं नाव केएल राहुलशी जोडलं गेलं. विक्रम फडणवीसनं लिहिलं, हल्ली तु खूपच उत्साहित दिसतेस चल केएलला जाऊयात. कुआलांपुर. विक्रमच्या या कमेंटवर अथियानं लगेचच रिप्लाय केला. तिनं लिहिलं, तुला ब्लॉक करावं लागेल. त्यावर विक्रमनं पुन्हा कमेंट केली की, मी अंपायरकडे तुझी तक्रार करेन अथिया एकदा तुझी विकेट गेली आहे. तो पुन्हा एकदा पवेलियनमध्ये परतत आहे. बिग बी म्हणाले, माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहा, महिला स्पर्धकाची झाली अशी अवस्था
अथियाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर ती लवकरच अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत मोतीचूर चकनाचूरमध्ये दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन देबा मित्रा हसन करत आहेत. तर राजेश आणि किरण भाटिया या सिनेमाचे निर्माता आहेत. याआधी अथियानं सूरज पंचोलीसोबत ‘हिरो’ सिनेमातून 2015मध्ये बॉलिवूड पदार्पण केलं होतं मात्र तिचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. पण सोशल मीडियावर मात्र तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. लग्नासाठी भारतात आलेल्या निकला उचलावे लागले सिलिंडर, वाचा नक्की काय झालं ===================================================================== VIDEO: आरेतील झाडांवर रात्री कुऱ्हाड; 700 झाडं परत द्या! आंदोलकांचा आक्रमक पवित्रा