मुंबई, 26 ऑगस्ट- गेल्या अनेक वर्षांपासून गायक केके तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता. त्याच्या आवाजाने लोकांना अक्षरशः वेड लावलं होतं. त्याच्या प्रत्येक गाण्याची प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. परंतु केकेच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. आजही त्याचे चाहते त्याच्या आवाजाला प्रचंड मिस करत आहेत. दरम्यान आता केकेची मुलगी तमारा कृष्णाने चाहत्यांमधील वडिलांची उणीव दूर करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. अलीकडेच तमाराने तिचा पहिला लाईव्ह कॉन्सर्ट केला. याक्षणी ती भावुकसुद्धा झाली होती. केकेची लेक तमारानं आपल्या आयुष्यातील पहिला लाईव्ह कॉन्सर्ट केला आहे. आपल्या पहिल्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये, तमाराला वडील केकेची प्रचंड उणीव भासत होती. तिने तिच्या पोस्टमध्ये याचा उल्लेख केला आहे. तमाराने प्रसिद्ध गायक आणि तिच्या दिवंगत वडिलांचा जिवलग मित्र शान यांच्यासोबत हा कॉन्सर्ट केला आहे. या सगळ्याची माहिती तिने तिच्या पोस्टमध्ये दिली आहे. तमाराने तिच्या पहिल्या लाइव्ह कॉन्सर्टचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तमाराने इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत लिहलंय, ‘पहिली गिग, खूप छान अनुभव होता. माझ्यासोबत राहिलेल्या सर्व महान कलाकारांचे आभार. विशेषत: शान काकांचे आभार, ज्यांच्यासोबत ‘इट्स टाइम टू डिस्को’ हे सॉन्ग गाणं खूप आश्वासक होतं. आज बाबा ज्याठिकाणी असतील तिथे खूप आनंदी असतील, आणि हसत असतील. जे काही घडत आहे त्यावर विश्वास बसत नाहीय.आज तुम्ही इथे हवं होता’.
**(हे वाचा:** Raju Srivastava: राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर, पण लेकीनं केली खास अपील ) केकेच्या लेकीचं त्यांच्या चाहत्यांनी खुल्या मनाने स्वागत केलं आहे. तिच्या पोस्टवर तिला शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कोलकत्ताच्या एका कॉलेजमध्ये लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान केकेचं निधन आलं होतं. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं होतं. आजही त्यांच्या चाहत्यांना या गोष्टीवर विश्वास ठेवणं कठीण आहे. चाहते सतत केकेचे जुने व्हिडीओ आणि सॉन्ग सोशल मीडियावर शेअर करुन त्याला मिस करत असतात.