मुंबई, 26 ऑगस्ट- प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव हे सध्या रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर अजूनही उपचार सुरु आहेत. चाहते आणि कुटुंबीय त्यांच्या प्रकृतीसाठी रात्रंदिवस प्रार्थना करत आहेत. आणि त्यामुळेच तब्बल 15 दिवसानंतर राजू श्रीवास्तव यांना शुद्ध आली आहे. त्यामुळे त्यांचे चाहते आणि जवळच्या व्यक्तींमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. दरम्यान कॉमेडियनच्या लेकीने त्यांच्या हेल्थबाबत अपडेट देत, लोकांना एक खास अपील केली आहे. राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा श्रीवास्तवने नुकतंच त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. अंतराने सोशल मीडियावर हेल्थ अपडेट डेट खास अपील केली आहे. अंतराने सांगितलं, ‘आता आपल्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यात सकारात्मक बदल होत आहेत. परंतु अजूनही ते व्हेंटिलेटरवरच आहेत. अंतराने लोकांना आवाहन केलं आहे की, कोणत्याही सोशल मीडिया किंवा इतर बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. तुम्ही फक्त एम्स किंवा राजू श्रीवास्तव यांच्या अधिकृत सोशल मीडियावर विश्वास ठेवा’. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत प्रचंड सावधगिरी बाळगली जात आहे. डॉक्टर क्षणोक्षणी त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. त्यांच्यावर रात्रंदिवस उपचार सुरु आहेत. त्यामुळे राजू श्रीवास्तव लवकरच पूर्णपणे बरे होतील अशी खात्री व्यक्त केली जात आहे. राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या कठीण काळात त्यांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या लोकांचे आणि प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच ही प्रार्थना अशीच सुरु राहूदे असं आवाहनही केलं आहे.
**(हे वाचा:** Raju Srivastava: शुद्धीवर येताच सर्वप्रथम ‘या’ व्यक्तीशी बोलले राजू श्रीवास्तव; म्हटले ‘हे’ चार शब्द ) राजू श्रीवास्तव यांना आली शुद्ध- राजू श्रीवास्तव यांचे जवळचे मित्र अशोक मिश्रा यांनी सांगितलं की, राजूभाऊ यांनी गेल्या 15 दिवसांपासून काहीही खाल्लेलं नाहीय. ते कोमात होते. त्यामुळे त्यांना प्रचंड अशक्तपणा आला आहे. त्यांना काहीच बोलता येत नाही. राजूभाऊ यांनी अडखळत आणि थरथरत्या आवाजात आपल्या पत्नीला म्हटलं - ‘हो, मी ठीक आहे.’ त्यांचे ओठ हलताना दिसत होते. राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीने तातडीने तेथे उपस्थित डॉक्टरांना माहिती दिली. राजू श्रीवास्तव यांचे सल्लागार अजित सक्सेना यांनी सांगितलं की, कॉमेडियन सकाळी 8.10 वाजता शुद्धीवर आले आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीत सकारात्मक सुधारणा होताना दिसून येत आहे.