रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी' शोची प्रेक्षकांना प्रचंड आतुरता आहे. यंदा या शोचा 13 वा सीजन असणार आहे.
'खतरों के खिलाडी 13'चं शूटिंग सध्या साऊथ आफ्रिकेत सुरु आहे. लवकरच हा शो टीव्हीवर दाखवला जाणार आहे.
तत्पूर्वी सेटवरुन सतत काही ना काही अपडेट समोर येत असतात. शो सुरु होण्यापूर्वी सेटवरुन एलिमिनेशनच्या बातम्या समोर येत आहेत.
विशेष म्हणजे या सीजनमध्ये बिग बॉस 16 चे दोन लोकप्रिय स्पर्धक झळकणार आहेत. हे स्पर्धक म्हणजे शिव ठाकरे आणि अर्चना गौतम होय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस गाजवलेली अर्चना गौतमी खतरों के खिलाडीच्या चौथ्या आठवड्यात एलिमिनेट झाली आहे. अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली तरी तिचे चाहते निराश झाले आहेत.