किरण खेर यांचा जन्म 14 जून 1955 रोजी चंदीगड, पंजाब येथे एका शीख कुटुंबात झाला. किरण यांचं सुरुवातीचं शिक्षण चंदीगडमधून झालं. त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठातून इंडियन थिएटर विभागात पदवीचं शिक्षण घेतलं. त्यांना दोन बहिणी आणि भाऊ होते. त्यांचा भाऊ अमरदीप 2003 मध्ये एका अपघातात मरण पावला. त्यांची बहीण कंवल ठक्कर कौर ही अर्जुन पुरस्कार विजेती बॅडमिंटन खेळाडू आहे. सध्या किरण हे चंदीगड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या खासदार आहेत. (फोटो क्रेडिट्स Instagram@kirronkhermp)
किरण खेर यांनी 'खूबसूरत', 'दोस्ताना', 'हम-तुम', 'फना', 'वीर-झारा', 'मैं हूं ना' आणि 'देवदास', 'मिलेंगे-मिलेंगे', 'कंबख्त इश्क', 'कुर्बान', 'फना', 'एहसास', 'अजब गजब लव्ह', 'खूबसूरत', 'टोटल सियापा' यांसारख्या अनेक चित्रपटात काम करून सर्वांची मनं जिंकली.
किरण खेरने चित्रपटांव्यतिरिक्त टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. किरण 1988 मध्ये टीव्ही शो 'इसी बहाने', 1999 च्या 'गुब्बारे' आणि 2004 च्या 'प्रतिमा' मालिकांमध्ये देखील दिसल्या होत्या.
किरण यांनी 1985 मध्ये बॉलिवूडचे दिग्गज अनुपम खेर यांच्याशी लग्न केलं. दोघांचं हे दुसरं लग्न होतं. अनुपम खेर यांचं पहिलं लग्न मधुमालतीशी झालं होतं. तर, किरण खेर यांचं आधी उद्योगपती गौतम बेरीशी लग्न झालं होतं. गौतम आणि किरण यांना सिकंदर खेर नावाचा मुलगा आहे.
रिपोर्टनुसार, किरण त्यांच्या पहिल्या लग्नानंतर पतीसोबतच्या नात्यात खूश नव्हत्या. त्यामुळे गौतम यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर अनुपम खोर यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. किरण आणि अनुपम खेर चंदीगडमध्ये भेटले होते, जिथे दोघेही एका थिएटरचा भाग होते. अनुपम आणि किरण यांचा विवाह 1985 मध्ये झाला.
चित्रपटांतील भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या किरण खेर 2014 साली पहिल्यांदा खासदार झाल्या. 2019 मध्येही त्या चंदीगडमधून निवडून आल्या आणि लोकसभेत पोहोचल्या.
किरण खेर यांनी 1983 मध्ये पंजाबी चित्रपट 'असर प्यार दा'मधून त्यांच्या करिअरची सुरुवात केली. 1996 मध्ये त्यांनी अमरीश पुरी यांच्यासोबत 'सरदारी बेगम'मध्ये काम केलं होतं, जो खूप गाजला होता.
किरण खेर त्यांचे पती अनुपम खेर यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, अनुपम खेर यांची एकूण संपत्ती 16.61 कोटी रुपये आहे. तर, किरण खेर यांनी 31.57 कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं आहे, जी त्यांच्या पतीच्या संपत्तीच्या दुप्पट आहे.
आम्ही तुम्हाला किरणबद्दल एक खास गोष्ट म्हणजे, त्या एक प्रतिभावान अभिनेत्री असण्यासोबतच तरुणपणी एक यशस्वी बॅडमिंटन खेळाडू देखील होत्या. किरण यांनी दीपिका पदुकोणचे वडील प्रकाश पदुकोण यांच्यासोबत राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळलं आहे. (फोटो सौजन्य : Instagram@kirronkhermp)
किरण यांच्यासाठी मागील वर्ष 2021 फारसं चांगलं गेलं नाही. कारण या वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना ब्लड कॅन्सरने ग्रासल्याचं समोर आलं. किरण यांच्यावर उपचार सुरू असूनही त्यांचा उत्साह कायम आहे. कर्करोगाच्या उपचारादरम्यान, त्या पुन्हा एकदा 'इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 9' च्या सेटवर जज म्हणून टीव्हीवर परतल्या. (फोटो सौजन्य : Instagram@kirronkhermp)