मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ओळखलं का 'या' अभिनेत्याला? दिसणार आहे मराठीतील सर्वांत बोल्ड सिनेमात

ओळखलं का 'या' अभिनेत्याला? दिसणार आहे मराठीतील सर्वांत बोल्ड सिनेमात

सोशल मीडियावर सध्या एका मराठमोळ्या कलाकाराचा फोटो व्हायरल होतोय. फोटोतील अभिनेत्याला ओळखण्यात अनेकांनी चूक केली. पाहा तुम्हाला ओळखता येतोय का हा अभिनेता.

सोशल मीडियावर सध्या एका मराठमोळ्या कलाकाराचा फोटो व्हायरल होतोय. फोटोतील अभिनेत्याला ओळखण्यात अनेकांनी चूक केली. पाहा तुम्हाला ओळखता येतोय का हा अभिनेता.

सोशल मीडियावर सध्या एका मराठमोळ्या कलाकाराचा फोटो व्हायरल होतोय. फोटोतील अभिनेत्याला ओळखण्यात अनेकांनी चूक केली. पाहा तुम्हाला ओळखता येतोय का हा अभिनेता.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई, 18 ऑगस्ट: मराठीमध्ये बरेच सिनेमा सध्या येऊ घातले आहेत. त्यातील एक सिनेमा म्हणजे टकाटक 2. सिनेमा उद्या म्हणजेच 19 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. टकाटक 2 हा मराठीतील सर्वात बोल्ड कंटेंट असलेला सिनेमा असल्याचं सांगण्यात आलं आहे. अभिनेता प्रथमेश परब प्रमुख भूमिकेत असलेल्या टकाटक  सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. टकाटकच्या यशानंतर आता टकाटक 2 सिनेमा दमदार गाणी आणि तगड्या कलाकारांसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमात अभिनेता प्रथमेश परबसह, अजिंक्य राऊत भूमी कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे अशी स्टारकास्ट आहे.  दरम्यान टकाटक 2 मधील एका अभिनेत्याचा फोटो समोर आला आहे. हा अभिनेता सर्वांच्या ओळखीचा आणि परिचयाचा आहे मात्र अनेकांनी त्यांना ओळखणं कठिण झालं आहे. मराठी सिनेसृष्टीला लाभलेल्या काही हरहुन्नरी, हुशार आणि समाजाचं भान असलेल्या कलाकारांपैकी फार कमी कलाकारांची नावं आहे. त्यातील एक अभिनेता म्हणजे किरण माने. टकाटक 2 सिनेमात किरण माने प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमा जरी बोल्ड असला तरी त्याचा विषय मात्र फार गंभीर आहे. गंभीर विषय एका वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आणि त्यात किरण माने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हेही वाचा - Baipan Bhaari Deva : केदार शिंदेंच्या नव्या सिनेमात दीपा परबची एंट्री; सांगणार 'तुमच्या आमच्या घरातल्या सुपरवूमनची गोष्ट' किरण मानेंनी नुकताच त्यांच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. जो पाहून अनेकांनी त्यांना ओळखलं नाहीये. किरण माने फोटोमध्ये फारचं तरुण आणि स्टायलिश दिसत आहेत. त्यांची हेअरस्टाइल, वेशभूषा सगळंच बदलल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी शेअर केलेला हा फोटो त्यांच्या टकाटक 2 सिनेमातील आहेत. सिनेमात किरण मानेंचा असा कुल तरुण लुक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. किरण मानेंचा बदलेला लुक पाहून त्यांचे चाहते देखील अवाक झाले आहेत. त्यांनाच ओळखूच येत नसल्यांनं त्यांच्या लुकचं अनेकांनी कौतुक केलं आहे. किरण मानेंच्या फोटोवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स करत त्यांचं कौतुक केलं आहे. एका चाहत्यानं म्हटलं, 'सर जी ह्योच लूक फिक्स ठेवा... कडक दिसताय', दुसऱ्या चाहत्यानं म्हटलंय, 'मला वाटतंय तुम्ही मिशा आणि दाढी नका काढू हाच चेहरा खराखुरा नायकाच्या भूमिकेत शोभतोय'. त्याचप्रमाणे, 'कडक', 'मस्त लुक सर', 'वळखलच नाय ब्बा', 'मस्त लूक आहे , बदलू नका', 'चपळ चित्ताच जणू', अशा अनेक भन्नाट कमेंट्स करत कौतुक केलं आहे.
First published:

Tags: Marathi cinema, Marathi entertainment

पुढील बातम्या