मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /रिया कपूरच्या लग्नात या तरुणीनं वेधलं सर्वांचं लक्ष; बोल्ड लुकमुळे तिच्याकडेच खिळल्या नजरा

रिया कपूरच्या लग्नात या तरुणीनं वेधलं सर्वांचं लक्ष; बोल्ड लुकमुळे तिच्याकडेच खिळल्या नजरा

ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांची मुलगी रिया कपूरचं (Rhea Kapoor) लग्न नुकतंच झालं. अनिल आणि सुनीता कपूर यांची धाकटी मुलगी आणि निर्माती रिया कपूरने तिचा बॉयफ्रेंड करण बुलानी (Karan Boolani) सोबत लग्न (marriage) केलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांची मुलगी रिया कपूरचं (Rhea Kapoor) लग्न नुकतंच झालं. अनिल आणि सुनीता कपूर यांची धाकटी मुलगी आणि निर्माती रिया कपूरने तिचा बॉयफ्रेंड करण बुलानी (Karan Boolani) सोबत लग्न (marriage) केलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांची मुलगी रिया कपूरचं (Rhea Kapoor) लग्न नुकतंच झालं. अनिल आणि सुनीता कपूर यांची धाकटी मुलगी आणि निर्माती रिया कपूरने तिचा बॉयफ्रेंड करण बुलानी (Karan Boolani) सोबत लग्न (marriage) केलं आहे.

पुढे वाचा ...

  मुंबई 16 ऑगस्ट : बॉलिवूडमधले लग्नसमारंभ, त्यातले थाटबाट, तिथं घडलेले किस्से हे कायम चर्चेचा विषय असतात. कुठल्या अभिनेत्रीने कुठला ड्रेस घातला होता इथपासून ते लग्नात झालेल्या मजा-मस्तीपर्यंतचं सगळं वर्णन वाचायला आणि त्याचे व्हिडिओ पाहायला चित्रपट रसिक आतुर झालेले असतात. ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांची मुलगी रिया कपूरचं (Rhea Kapoor) लग्न नुकतंच झालं. अनिल आणि सुनीता कपूर यांची धाकटी मुलगी आणि निर्माती रिया कपूरने तिचा बॉयफ्रेंड करण बुलानी (Karan Boolani) सोबत लग्न (marriage) केलं आहे.

  हा लग्नसोहळा अत्यंत खासगी व निवडक लोकांच्या उपस्थितीमध्ये झाला. या लग्नसोहळ्यात मात्र कपूर कुटुंबातील (kapoor family) मुलींनी आपल्या ट्रेडिशनल स्टाइलने (traditional style) सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामध्येही या परिवारातील खुशी कपूर (khushi kapoor) हिने घातलेल्या फॅशनेबल ब्लाउजमुळे सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे आकर्षित होत होत्या. नवभारत टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

  Indian Idol 12 Winner : अखेर 'हा' हिरा ठरला 12 वा इंडियन आयडल

  खुशी कपूर म्हणजे अर्जुन कपूरची बहीण. ही नेहमीच आपल्या फॅशनमुळे तिच्याकडे लक्ष वेधून घेत असते. तिने तिची चुलत बहिणी रिया कपूर हिच्या लग्नात भारतीय पारंपरिक कपडे परिधान केले होते. या कपड्यांमध्ये ती हॉट दिसत होती. रुपेरी पडद्यापासून दूर राहणाऱ्या खुशीने लग्नात पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. जो तिला खूपच सुंदर दिसत होता.

  खुशीने मुंबईतील नेत्री अग्रवाल लेबलमधून हा ड्रेस घेतला होता. तिचा स्कर्ट हा स्ट्रेट कटमध्ये होता. ज्यामध्ये टॉप स्टिच्ड प्लॅट्स घातले होते. त्याच्याबरोबर तिने घातलेल्या ब्लाउजवर रिच वर्क करण्यात आलं होतं. या ब्लाउजमुळे संपूर्ण लुकमध्ये बोल्डनेस आला होता. खुशीच्या या स्टायलिश ‘देसी लूक’ला गोल्डन मेटॅलिक कडं, ब्रेसलेट, झुबक्याचं कानातलं, गळ्यातील सोन्याची साखळी, अंगठी आणखीनच शोभा आणत होती.

  कपूर कुटुंबातील शनाया कपूर ही सुद्धा आपल्या बहिणीच्या लग्नात खुशी कपूरसारखीच सुंदर आणि हॉट दिसत होती. बॉलिवूडमध्ये प्रवेश करीत असलेल्या या अभिनेत्रीने बॉलिवूडच्या यंग ब्रिगेडमध्ये प्रसिद्ध असलेल्या फॅशन डिझायनर अर्पिता मेहता यांच्याकडून स्वतःसाठी एक सुंदर केशरी रंगाचा लेहंगा बनवून घेतला होता. हा रंग तिच्यावर खूपच सुंदर दिसत होता. या सेटमध्ये कॅमल ब्लर्ड पोल्का प्रिंट लेहंगा स्कर्ट होता. यावर सुंदर वर्क असणारा ब्लाउज होता. हा ड्रेस शनायाचा लूक सुपर हॉट करत होता. लेहंग्यासोबत सिल्कचा दुपट्टा होता, ज्याची बॉर्डर सजवलेली होती. या लेहंग्यामध्ये शनाया तिचा कमनीय बांधा फ्लॉन्ट करताना दिसली.

  'Bigg Boss OTT'चं झालं पहिलं एलिमिनेशन, 'संडे का वार' मध्ये कोण गेलं घराबाहेर

  याशिवाय, अंशुला कपूरने तिच्या बहिणीच्या लग्नासाठी लाल रंगाची साडी निवडली होती. अंशुला ही फॅशन प्रेमी म्हणून ओळखली जाते. तिने निवडलेल्या साडीवर प्लेन प्लिट्ससोबतच एम्ब्रॉयडर्ड बेल्ट पोर्शन होते. हेच वर्क तिच्या व्ही कट नेकलाइनच्या ब्लाउजवर दिसले. मोकळे केस सोडल्यामुळे तिचा लूक अधिकच खुलून दिसत होता. अशा प्रकारे सर्वांनीच रिया कपूरचं लग्न खूप एँजॉय केलं आणि आपल्या चाहत्यांनाही फोटो पाहण्याची पर्वणी दिली.

  First published:
  top videos

   Tags: Arjun kapoor, Bollywood actress, Marriage