जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / KGF 2 Box Office: यशच्या चित्रपटाची बंपर ओपनिंग, पहिल्याच दिवशी चित्रपटाचं बजेट वसूल

KGF 2 Box Office: यशच्या चित्रपटाची बंपर ओपनिंग, पहिल्याच दिवशी चित्रपटाचं बजेट वसूल

KGF Chapter2

KGF Chapter2

‘RRR’ नंतर आता ‘KGF 2’ या साऊथ सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. पहिल्या भागाच्या थरारक अनुभवानंतर प्रेक्षक दुसरा भाग पाहण्यासाठी उत्सुक होते. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची तुफान चर्चा सुरु होती. चित्रपटाचे ट्रेलरसुद्धा सुसाट व्हायरल झाले होते. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उफारच आतुर असलेले दिसत होते.हा चित्रपट काल अर्थातच 14 एप्रिलला जगभरात रिलीज झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 एप्रिल-   ‘RRR’ नंतर आता ‘KGF 2’ या साऊथ सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. पहिल्या भागाच्या थरारक अनुभवानंतर प्रेक्षक दुसरा भाग पाहण्यासाठी उत्सुक होते. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची तुफान चर्चा सुरु होती. चित्रपटाचे ट्रेलरसुद्धा सुसाट व्हायरल झाले होते. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक फारच आतुर असलेले दिसत होते.हा चित्रपट काल अर्थातच 14 एप्रिलला जगभरात रिलीज झाला आहे. पहिल्या दिवशी ‘KGF: Chapter 2’ ने जगभरात जोरदार सुरुवात केली आहे. गुरुवारी रिलीज झालेल्या KGF: Chapter 2 च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा  (KGF 2 First Day Box Office Collection)  रिपोर्ट समोर आला आहे. पाहूया काय आहे बॉक्स ऑफिस रिपोर्ट? सुपरस्टार यशच्या या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग केली आहे. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, चित्रपट पहिल्याच दिवशी चित्रपटाने 130 कोटींहून अधिक कमाई केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. KGF: Chapter 2 ला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगले रिव्ह्यू मिळत आहेत. येत्या काही दिवसांत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. प्रशांत नील दिग्दर्शित चित्रपटाचं ओपनिंग फिगर उत्कृष्ट आलं आहे. कोरोना काळात बर्‍याच वेळा पोस्टपोन केल्यानंतर, KGF: Chapter 2 अखेर काल चित्रपटगृहांमध्ये तब्बल पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. एकीकडे या चित्रपटाने कन्नड भाषेत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. तर दुसरीकडे हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर 50 कोटींचा आकडा गाठला आहे. विशेष म्हणजे, ट्रेंड ऍनालिसिस्टने असा अंदाज वर्तवला होता की, हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट पहिल्या दिवशी 130 ते 140 कोटींचा गल्ला जमवेल. दरम्यान चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी 50 कोटी रुपये कमावले आहेत. अशा परिस्थितीत 100 कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी हा खर्च भरून काढला आहे.

जाहिरात

या चित्रपटात यशसोबत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आणि रवीना टंडन (Raveena Tandon) यांच्यासह साऊथ अभिनेत्री श्रीनिधी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट काल्पनिक नसून सत्य कथेवर आधारित आहे. ही सोन्याच्या खाणीची सत्य थरारक कथा आहे. या कथेवरच हा चित्रपट बनविण्यात आला आहे. सोन्याच्या हव्यासापोटी केजीएफच्या परिसरात रक्तपात आणि प्रगतीही पाहायला मिळाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात