मुंबई, 14 जून- मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray Birthday) यांचा आज वाढदिवस आहे. राज ठाकरे सध्या होम क्वारंटाईन असल्यामुळे ते आज कोणालाही भेटणार नाहीत. असं जरी असलं तरी सोशल मीडियावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. निर्माता केदार शिंदे (Kedar Shinde ) आणि राज ठाकरे यांची मैत्री जगजाहीर आहे. अनेकदा राज ठाकरे यांच्याविषयी केदार शिंदे सोशल मीडियावर भरभरून लिहिताना दिसतात. राज ठाकरे देखील केदार शिंदे यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावताना दिसतात. यातून या दोघांच्यातील मैत्री दिसून येते. आज आपल्या जवळच्या मित्राचा वाढदिवस आहे म्हटल्यांवर केदार शिंदे यांनी त्यांच्यासाठी **((Raj Thackeray Kedar Shinde friendship )**दोनच शब्दात त्यांचं वर्णक केलं आहे. पण हे दोनच शब्द त्यांना मोठं बनवतात हेही तितकचं खरं आहे. सध्या केदार शिंदे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. केदार शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतचा एक सुंदर फोटो शेअर करत म्हटलं आहे की, राजा माणूस… @raj_shrikant_thackeray वाढदिवस शुभेच्छा. @mns_adhikrut.केदार शिंदे यांच्या या पोस्टवर अनेकांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत या दोघांच्या मैत्रिची कौतुक केलं आहे. वाचा- ‘मोठा नको होऊ…’; मृण्मयीने सिद्धार्थच्या बर्थडेला शेअर केला भन्नाट PHOTO एका चाहत्याने राज ठाकरे यांच्यावरील प्रेम व्यक्त करत म्हटलं आहे की,वाढदिवस_साहेबांचा_वाढदिवस_लोकप्रिय_माणसाचा #वाढदिवस_अभ्यासू_नेतृत्वाचाआदरणीय साहेब, तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र विराजमान होवो. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच देवा चरणी प्रार्थना. आपणांस वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा !😊💐 तर दुसऱ्या एका चाहत्याने म्हटलं आहे की, दो शेर एक फ्रेम मे….अशा अनेक कमेंट केदार शिंदे यांच्या पोस्टवर आल्या आहेत.
राज ठाकरे सध्या होम क्वारंटाईन असल्यामुळे ते आज कोणालाही भेटणार नाहीत. त्यामुळे मनसैनिकांनी शुभेच्छा देण्यासाठी ‘शिवतीर्थ’वर येऊ नये, अशी सूचना राज ठाकरे यांनी केली आहे. असं जरी असलं तरी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील विविध भागांमध्ये उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी राज ठाकरे यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत.