जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / हृतिकसाठी अभिनेत्रीचा Shocking निर्णय, म्हणते... ‘नवऱ्याला टेकडीवरुन ढकलून देऊ का?’

हृतिकसाठी अभिनेत्रीचा Shocking निर्णय, म्हणते... ‘नवऱ्याला टेकडीवरुन ढकलून देऊ का?’

Kavita Kaushik

Kavita Kaushik

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक (Kavita Kaushik) नवऱ्यासंदर्भात धक्कादायक ट्विट केले. ‘नवऱ्याला टेकडीवरुन ढकलून देऊ का?’असे ट्विटमध्ये म्हणत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 3 जानेवारी: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक (Kavita Kaushik) सध्या तिच्या एका पोस्टमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच तिने नवऱ्यासंदर्भात धक्कादायक ट्विट केल्याने सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. पण तिच्या या ट्विटमागचे कारण ऐकाल तर डोक्याला हात मारुन घ्याल. ‘नवऱ्याला टेकडीवरुन ढकलून देऊ का?’ असे ट्विट कविताने वर्षाच्या सुरुवातीलाच केले आहे. यामागचे कारण म्हणजे बी टाऊनचा हँडसम हंक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन(Hrithik Roshan). नव्या वर्षाचे स्वागत हृतिकने शर्टलेस (Hrithik Roshan Shirtless Photo) फोटो शेअर केले. त्याची बॉडी पाहून अनेक तरुणी फिदा झाल्या. पण अभिनेत्री कविता भलतीच फिदा झाल्याचे पाहायला मिळाले. तिने हृतिकचे नववर्षाचे ट्विट रिट्विट करत ‘म्हणजे काय करु? नवऱ्याला टेकडीवरुन ढकलून देऊ का?’ अशी मजेशीर कॅप्शन दिली आहे. तिच्या या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जाहिरात

हृतिकने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शर्टलेस फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘2022’ असे कॅप्शन दिले आहे. सध्या हृतिकचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. विताची लोकप्रिय मालिका ‘FIR’ नंतर तिने काही काळ मालिकांमधून ब्रेक घेतला त्यानंतर ती कलर्सवरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस 14’ मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती, मात्र घरात सतत वाद होत असल्याने तिने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात