जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / KBC 14: 1 कोटी जिंकूनही करोडपती नाही बनली कविता चावला; काय आहे नेमकं प्रकरण?

KBC 14: 1 कोटी जिंकूनही करोडपती नाही बनली कविता चावला; काय आहे नेमकं प्रकरण?

KBC 14: 1 कोटी जिंकूनही करोडपती नाही बनली कविता चावला; काय आहे नेमकं प्रकरण?

आपल्या ज्ञानाच्या बळावर कविता यांनी शोमध्ये 1 कोटी रुपये जिंकले आहेत, पण ती खरंच करोडपती होऊ शकेल का? हा प्रश्न विचारला जात आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 सप्टेंबर-   बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय रिऍलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ सीजन 14 ला पहिला करोडपती मिळाला आहे. ज्ञान आणि परिश्रमाने, एखादी व्यक्ती काहीही साध्य करू शकते आणि ‘कौन बनेगा करोडपती’ तुम्हाला असं व्यासपीठ प्रदान करते, जिथे तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या जोरावर रातोरात करोडपती होऊ शकता.‘कौन बनेगा करोडपती’ सीजन 14 ची पहिली करोडपती महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील कविता चावला या झाल्या आहेत. आपल्या ज्ञानाच्या बळावर कविता यांनी शोमध्ये 1 कोटी रुपये जिंकले आहेत, पण ती खरंच करोडपती होऊ शकेल का? हा प्रश्न विचारला जात आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना कविता चावला या खरंच आता करोडपती झाल्याचंवाटत असेल, पण वास्तव यापेक्षा थोडं वेगळं आहे.वाटलं ना आश्चर्य? हो हे खरं आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये जिंकलेली कोणतीही रक्कम थेट कोणत्याही स्पर्धकाला जात नाही. शोमध्ये जिंकलेल्या पैशावर स्पर्धकांना भरपूर कर भरावा लागतो. मात्र, विजेत्या रकमेवर किती टक्के कर कापला जातो याबाबत KBC च्या टीमने कोणतीही माहिती दिलेली नाहीय. याच कारणामुळे करोडपती झाल्यानंतरही कोल्हापूरची कविता चावला प्रत्यक्षात करोडपती बनू शकली नाहीय. केबीसीच्या चौदाव्या सीजनमध्ये 1 कोटी जिंकणारी कविता चावला या शोमध्ये 7.5 कोटी रुपये जिंकू शकली असती, परंतु तिने जास्त धोका पत्करला नाही आणि आपली हुशारी दाखवली आणि आपला खेळ योग्य वेळी बंद केला. शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या खेळाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. सध्या कविता चावला प्रचंड चर्चेत आहेत. लोक सतत त्यांच्याबाबत लहान-लहान अपडेट्स जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

**(हे वाचा:** मान्या सिंग बनली Bigg Boss 16 ची पहिली कन्फर्म स्पर्धक; नेमकी आहे तरी कोण? ) एक कोटी रुपये जिंकल्यानंतर सर्वत्र कविता चावलाची चर्चा होताना दिसत आहे. सोशल मीडियावरही त्यांची प्रचंड चर्चा होत आहे. पण एक कोटी जिंकण्याचा त्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. शोदरम्यान त्यांना अनेक कठीण प्रश्नांनाही सामोरं जावं लागलं होतं. परंतु धैर्य आणि संयमाच्या बळावर त्यांनी चौदाव्या सीजनची पहिली करोडपती बनण्याचा बहुमान पटकावला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात