Home /News /entertainment /

KBC 13: कोणता होता 25 लाखांसाठीचा प्रश्न ज्याचं उत्तर सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफला नाही देता आलं

KBC 13: कोणता होता 25 लाखांसाठीचा प्रश्न ज्याचं उत्तर सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफला नाही देता आलं

KBC 13: या प्रश्नाचं योग्य उत्तर सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ या दोघांनाही माहिती नसल्याने त्यांनी एक्सपर्टचा सल्ला घेतला. अमिताभ यांनी जॅकीला जुम्मा चुम्माची स्टेप शिकवली, ते मात्र गाजलं. पाहा VIDEO

  मुंबई, 25 सप्टेंबर:  'कौन बनेगा करोडपती' च्या नुकत्याच झालेल्या भागात सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ यांनी (Suniel Shetty and Jackie Shroff in KBC) उपस्थिती लावली होती. 'कौन बनेगा करोडपतीच्या' (KBC 13 Amitabh bachchan) एपिसोडमध्ये जॅकी आणि सुनील हे एका स्वयंसेवी संस्थेसाठी हा गेम खेळायला बसले. अमिताभ यांच्यासमोर हॉटसीटवर बसून या दोन अभिनेत्यांनी धम्माल केली. 25 लाख जिंकलेही. पण तो शेवटचा प्रश्न त्यांना थोडा अवघड गेला. असा कोणता प्रश्न होता की ज्यावर या दोघांची दौड थांबली? सोनी वाहिनीवरच्या छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असा शो म्हणजे 'kaun banega crorepati 13 ‘कौन बनेगा करोडपती. बॉलिवूडचे 'बिग बी' म्हणून ज्यांना ओळखले जाते ते म्हणजे Amitabh Bachchan  (अमिताभ बच्चन) . ते या शोचे सूत्रसंचालन करतात. या शो मध्ये बिग बी हॉटसीटवर बसणाऱ्या व्यक्तीला प्रश्न तर विचारतातच,  पण या सोबत स्पर्धकांशी गप्पा देखील मारतात. ‘कौन बनेगा करोडपती’च्या नुकत्याच पार पडलेल्या भागामध्ये बॉलिवूडचा भीडू अर्थात अभिनेता जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टीने हजेरी लावली. या आठवड्यातील शुक्रवारी 'कौन बनेगा करोडपती 13' मध्ये जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी उपस्थित होते. कौन बनेगा करोडपती नं या दोन अभिनेत्यांची Thalassemia आजाराशी लढणाऱ्या मुलांसाठी लागणाऱ्या खर्चासाठी शिफारस करण्यात आली होती. त्यासाठी या दोघांनी सेटवर हजेरी लावली होती.
  या दरम्यान कौन बनेगा करोडपती 13 चे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन  हे त्यांच्यासोबतच्या जुन्या आठवणी समोर आणत मजा मस्ती करताना दिसत होते. पण असा कोणता प्रश्न होता ज्यामुळे त्यांना 25 लाख रुपये प्राप्त होणार होते, पण त्या प्रश्नाचे उत्तर दोघांपैकी एकालाही देता आले नाही. जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यांना 25 लाख रुपयांसाठी  विचारण्यात आलेला प्रश्न- विवेकानंद योग विश्वविद्यालय जे भारता बाहेरील देशातील पहिले योग विश्वविद्यालय आहे ते यूएसच्या कोणत्या शहरात जून २०२०मध्ये लाँच केले गेले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर दोघांनाही माहिती नसल्याने त्यांनी एक्सपर्ट ऋचा यांचा सल्ला घेतला. त्यानंतर या प्रश्नाचे योग्य उत्तर लॉस एंजेलिस असे होते. त्यानंतर त्यांनी 25 लाख ही रक्कम जिंकली. त्यांनी ही रक्कम लोकांच्या मदतीसाठी दिली. अमिताभ बच्चनचे जॅकी श्रॉफने केलं त्यांच्या भिडू भाषेत कौतुक... जॅकी श्रॉफ ने अमिताभ यांचे त्याच्या स्टाइलमध्ये ' बोले तो क्या बोल रहा है भिडू ' या भाषेत कौतुक केले. ' अपून को भी तुमसे मिलकर मजा आरेला हैं, बोले तो ये सुट पहन कर आया है ना तुम क्या मस्त लग रेला हैं, असे ते अमिताभ यांना म्हणाले.
  सोबतच तिथे उपस्थित सर्वांना जॅकी म्हणाले, की साब भाई लोक सुन रहे है ना, सब एकदम रापचीक लग रहे है. अशा शब्दात अमिताभ यांच्यासोबत गप्पा मारल्या.
  First published:

  Tags: Amitabh Bachchan, Jackie shroff, KBC, Sunil shetty

  पुढील बातम्या