मुंबई : बॉलिवूड स्टार सलमान खान आणि कॅटिरिनाच्या संबंधांची चर्चा अजुनही होत असते.
हे दोघं आता रिलेशनशीपमध्ये नसले तरी त्यांच्याबद्दल कायम चर्चा होत असते.
अशातच सलमान आणि कॅटरिनाच्या डान्सचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
त्यात सलमान कॅटचा हात हातात घेऊन डान्स करत असल्याचं दिसत आहे.
दंबग चित्रपटानंतर दुबई दौऱ्यावर असताना दिल दिया गल्लां’ या गाण्यावर दोघं डान्स करतानाचा तो व्हिडीओ आहे.
या गाण्यात तो कॅटरिनाच्या जवळ येतो आणि तिचा हात हातात घेतो.
त्यावेळी कॅटरिनाही अगदी सहपणे त्याला साथ देत असल्याचं दिसतंय.
दबंगमध्ये सलमान आणि कॅटरिनाची उत्तम केमेस्ट्री दिसून आली होती.
सलमानला कॅटरिनानेही उत्तम प्रतिसाद दिल्याने दोघांचा डान्स प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरलाय.
त्यामुळे या व्हिडीओला प्रेक्षकांनीही जोरदार पसंती दिली असून हा व्हिडीओ चांगलाच पुन्हा व्हायरल होतोय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







