मुंबई,12 एप्रिल- बॉलिवूड मध्ये नेहमीच अभिनेत्रींमध्ये किंवा अभिनेत्यांमध्ये वादविवाद, कॅट फाइट्स पाहायला मिळत असतात. हे आता फारसं नवं नाही राहिलं. परंतु सध्या दोन सेलिब्रेटींच्या कुटुंबीयांमध्ये कॅट फाईट सुरु झालेलं पाहायला मिळत आहे. हा वाद इतर कुणामध्ये नसून बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या आईमध्ये सुरु आहे. याची सुरुवात रणबीरची आई अर्थातच अभिनेत्री नीतू कपूर यांनी केली आहे. याला आता कतरिनाच्या आईने उत्तर देत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर या वयातसुद्धा तितक्याच बिनधास्त आणि ऍक्टिव्ह आहेत. सोशल मीडियावरसुद्धा त्यांचा बोलबाला आहे. नीतू कपूर नेहमीच सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतात. कधी त्या आपल्या कुटुंबाबाबत पोस्ट करतात. तर कधी आपल्या व्यावसायिक आयुष्याबाबत.
त्यांच्या प्रत्येक पोस्टला चाहते भरभरुन प्रेम आणि प्रतिसाद देत असतात. दरम्यान नुकतंच नीतू कपूर यांनी एक क्रिप्टीक पोस्ट शेअर केली होती. नेटकऱ्यांच्या मते त्यांनी ही पोस्ट रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडवर निशाणा साधण्यासाठी लिहली होती. (हे वाचा: ‘जिहाल ए मिस्की मकुन बरंजिश’; 90 टक्के लोकांना आजही माहिती नाही लतादीदींच्या या गाण्याचा अर्थ ) नीतू कपूर यांची ती पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. दरम्यान आता कतरीना कैफच्या आईनेसुद्धा एक पोस्ट शेअर केली आहे. जी नीतू कपूर यांच्या पोस्टला सडेतोड उत्तर देण्यासाठी असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे कतरीना कैफ आणि रणबीर कपूर या एक्स जोडप्याच्या आईंमध्ये कॅट फाइट्स सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या कतरीना कैफच्या आईची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. नेटकरी नीतू यांच्या पोस्टला चोख उत्तर दिल्याने त्यांचं कौतुक करत आहेत.
नीतू सिंग यांची पोस्ट- नुकतंच नीतू सिंग यांनी एक क्रिप्टीक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये असं लिहलं होतं. 7 वर्षे डेटिंग केल्याचा अर्थ असा नाही की तो तुमच्याशी लग्न करेल. माझ्या काकांनी ६ वर्षे मेडिकलचा अभ्यास केला पण ते आता डीजे आहेत’. या पोस्टचा संबंध नेटकऱ्यांनी कतरिना कैफसोबत जोडला आहे. कारण सर्वांनाच माहिती आहे की, रणबीर कपूरने कतरीना कैफला तब्बल 7 वर्षे डेट केलं आहे. परंतु त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. कतरीना कैफच्या आईची पोस्ट- नितु सिंग यांची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता कतरीना कैफच्या आईची या प्रकरणात एन्ट्री झाल्याचं म्हटलं जात आहे. कारण कतरिनाच्या आई सुजैन यांनी नुकतंच आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहलंय, ‘मला असे संस्कार मिळाले आहेत, जिथे सफाई कामगारलासुद्धा तोच आदर आणि सन्मान दिला जातो जो एका कंपनीच्या सीइओला दिला जातो’. ही पोस्ट आता सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.