बॉलिवूडची फिट गर्ल कतरीना (Katrina Kaif) ही तिच्या चित्रपटांइतकीच सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. पण सोशल मीडियावरही कतरीनाने सगळ्यांना मागे टाकलं आहे. अगदी कमी काळातच तिने कोट्यावधी फॉलोवर्सना भुरळ घातली असं म्हणायला हरकत नाही.
कतरीना तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळपासून मीडियापासून फारच अलिप्त होती. इतकच काय तर ती सोशल मीडियाही वापरत नव्हती.
कतरिनाच्या पुढे प्रियंका चोप्रा, दीपिका पादूकोन आणि आलिया भट्ट ही आहेत. पण कतरीना मात्र सगळ्यात उशीरा सोशल मीडियावर येऊन तेजीने पुढे जाताना दिसत आहे.