मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /आदेश बांदेकरांनी कतरिनाला दिली पैठणी! पाहा बॉलिवूडअभिनेत्रीचा मराठमोळा सन्मान

आदेश बांदेकरांनी कतरिनाला दिली पैठणी! पाहा बॉलिवूडअभिनेत्रीचा मराठमोळा सन्मान

रोहित शेट्टीचा बहुप्रतीक्षित 'सूर्यवंशी' हा चित्रपट ३० एप्रिल २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

रोहित शेट्टीचा बहुप्रतीक्षित 'सूर्यवंशी' हा चित्रपट ३० एप्रिल २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

रोहित शेट्टीचा बहुप्रतीक्षित 'सूर्यवंशी' हा चित्रपट ३० एप्रिल २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

मुंबई,20ऑक्टोबर- नुकताच 'झी मराठी अवॉर्ड्स २०२१' (Zee Marathi Aword 2021) चा दिमाखदार सोहळा पार पडला. यावेळी सोहळा थोडा जास्तच खास होता. कारण यामध्ये मराठीसोबतच हिंदीच्या काही प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती. हे कलाकार म्हणजे रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि कतरिना कैफ(Katrina Kaif) होय. या दोघांच्या उपस्थितीने सोहळ्याचा आनंद द्विगुणित झाला होता. इतकंच नव्हे तर या बॉलिवूड अभिनेत्रीला अगदी मराठमोळ्या पद्धतीने पैठणी साडी देऊन तिचा सन्मान करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचं महावस्त्र म्हणून 'पैठणी'ला ओळखलं जात. आदेश बांदेकर(Aadesh Bandekar) यांनी 'होम-मिनिस्टर' या कार्यक्रमाद्वारे गेली १७ वर्ष तमाम वहिनींना पैठणी देऊन त्यांचा सत्कार व सन्मान केला आहे. पण यावेळी झी मराठी अवॉर्ड्स २०२१ मध्ये बांदेकर भाओजींनी चक्क एका बॉलिवूड मधल्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा पैठणी देऊन सन्मान केला. हि अभिनेत्री म्हणजेच कतरीना कैफ होय. कतरीनाने तिच्या अभिनय आणि सौंदर्याने फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे.चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी धडपडत असतात. नुकतंच संपन्न झालेल्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात कतरीना कैफ आणि रोहित शेट्टी यांनी हजेरी लावली होती.

त्यांच्या आगामी 'सूर्यवंशी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी आदेश बांदेकर यांनी कतरीनाचं स्वागत अगदी मराठमोळ्या पद्धतीतने महाराष्ट्राचं लोकप्रिय वस्त्र पैठणी भेट देऊन केलं. इतका प्रेमळ आणि पारंपरिकरित्या केलेला सन्मान पाहून कतरीना कैफ भारावून गेली होती. तिच्या चेहऱ्यावरील आनंदचं सगळं काही सांगून जात होता. हा सोहळा आणि हा सन्मान रसिक प्रेक्षकांना शनिवार ३० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठी अवॉर्ड्स २०२१ मध्ये पाहायला मिळणार आहे.

रोहित शेट्टीचा बहुप्रतीक्षित 'सूर्यवंशी' हा चित्रपट ३० एप्रिल २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच सर्वांना चित्रपटाची उत्सुकता लागली होती. मात्र देशात सुरु असलेल्या कोरोना परिस्थितीमुळे चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं होतं. मात्र अखेर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आल्यानं सर्वच लोक उत्सुक झाले आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंह आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या भूमिका आहेत. अक्षयचा रोहितसोबत हा पहिलाच चित्रपट आहे. रणवीरने सिम्बा आणि अजयने बोल बच्चन, सण ऑफ सरदारसारख्या विविध चित्रपटात रोहितसोबत काम केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Katrina kaif