जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बालपणीच्या आठवणी होणार ताज्या; अमेय वाघ पुन्हा होतोय फास्टर फेणे

बालपणीच्या आठवणी होणार ताज्या; अमेय वाघ पुन्हा होतोय फास्टर फेणे

बालपणीच्या आठवणी होणार ताज्या; अमेय वाघ पुन्हा होतोय फास्टर फेणे

ही ऑडिओबूक भा.रा.भागवत (B.R. Bhagwat Books) यांच्या फास्टर फेणे (Faster Fene) या पुस्तक मालिकेवर आधारित आहे. अन् यामध्ये तो मुख्य व्यक्तिरेखा बनेश फेणेला आवाज देणार आहे. (Faster Fene audiobook)

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 8 मे**:** अमेय वाघ (Amey Wagh) हा मराठी मनोरंजनसृष्टीतील सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो एक उत्तम अभिनेता तर आहेच पण सोबतच त्याला चांगली मिमिक्री देखील करता येते. अन् त्याच्या मिमिक्रीचे फॅन असलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बाबती आहे. अमेय एक ऑडियोबूक घेऊन लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे. ही ऑडिओबूक भा.रा.भागवत (B.R. Bhagwat Books) यांच्या फास्टर फेणे (Faster Fene) या पुस्तक मालिकेवर आधारित आहे. अन् यामध्ये तो मुख्य व्यक्तिरेखा बनेश फेणेला आवाज देणार आहे. (Faster Fene audiobook) फास्टर फेणे ही प्रसिद्ध लेखक भा.रा.भागवत यांची एक लोकप्रिय पुस्तक मालिका आहे. या बाल साहस कादंबऱ्यांच्या मालिकेत एकूण 20 पुस्तकं आहेत. अन् ही सर्व पुस्तकं आता ऑडिओबूकच्या स्वरुपात स्टोरीटेलवर उपलब्ध होणार आहेत. या ऑडिओबूकमध्ये अमेय वाघ बनेश फेणे अर्थात फास्टर फेणेला आवाज देणार आहे.

जाहिरात

‘फास्टर फेणे’ या मालिकेतील पहिलं पुस्तक 1974मध्ये प्रकाशित झालं होतं. ‘फास्टर फेणे’ हे मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय गुप्तहेर पात्रांपैकी एक आहे. या मालिकेची भाषांतरं इंग्रजी व हिंदी या भाषांमध्येही झाली आहेत. 1987मध्ये दूरदर्शनवर ‘फास्टर फेणे’च्या या कथांवर आधारित मालिका सादर करण्यात आली होती. या मालिकेत सुमीत राघवननं ‘फास्टर फेणे’ची भूमिका केली होती. त्यानंतर काही वर्षांपूर्वी अमेय वाघनं चित्रपटामध्ये हीच भूमिका साकारली होती. यामध्ये त्यानं केलेलं काम प्रेक्षकांना प्रचंड आवडलं होतं. त्याची भरपूर स्तुती करण्यात आली होती. म्हणूनच ऑडिओबूकला देखील त्याचाच आवाज दिला जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात