जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Kartik Aryan च्या हाती लागला आणखी एक चित्रपट, पडद्यावर करणार 'आशिकी'

Kartik Aryan च्या हाती लागला आणखी एक चित्रपट, पडद्यावर करणार 'आशिकी'

kartik aryan

kartik aryan

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनची मोठ्या प्रमाणावर क्रेझ आहे. ‘भूल भुलैया 2’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर त्याची लोकप्रियता आणखीनच वाढली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 5 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनची मोठ्या प्रमाणावर क्रेझ आहे. ‘भूल भुलैया 2’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर त्याची लोकप्रियता आणखीनच वाढली आहे. तो सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. त्याची लोकप्रियता पाहता कार्तिकच्या हाती नवनवे चित्रपट लागत आहेत. अशातच कार्तिकने पोस्ट शेअर करत त्याच्या आगामी चित्रपटाविषयी माहिती दिली आहे. कार्तिक आर्यन लवकरच ‘आशिकी 3’ या चित्रपटात दिसणार आहे. याविषयी त्यानं इन्स्टाग्रामवर एख व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये अरिजित सिंहच्या आवाजातील ‘अब तेरे बिन जी लेंगे हम’ हे गाणं ऐकू येत आहे. इतकेच नाही तर कार्तिक आर्यन पहिल्यांदाच अनुराग बसूसोबत काम करणार आहे. या नवीन प्रोजेक्टसाठी कार्तिक खूपच उत्सुक आहे. दिग्दर्शक अनुराग बसूला कार्तिक आर्यनसोबत काम करण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती. कार्तिक आर्यनला साइन करण्याची तो आतुरतेने वाट पाहत होता.

जाहिरात

‘आशिकी’ आणि ‘आशिकी 2’ हे ब्लॉकबस्टर चित्रपट ठरले असून आता ‘आशिकी 3’ची तयारी सुरू झाली आहे. आशिकी चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. त्यामुळे तिसऱ्या भागासाठी प्रेक्षक खूप आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची इच्छा पूर्ण होत आहे. त्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण पहायला मिळत आहे. हेही वाचा -  एकेकाळी केक घेण्यासाठीही नव्हते पैसे, आज करोडोंचे मालक आहेत Pankaj Tripathi, इतकी आहे संपत्ती दरम्यान, आशिकी 3 मध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच वेळी, या चित्रपटासाठी अद्याप महिला लीडची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे कार्तिकसोबत कोणती अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार हे पाहण्यासाठी चाहते कमालीचे एक्सायडेट आहेत. त्यामुळे अभिनेत्रीचं नाव कधी समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात