मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बॉलिवूडला पुन्हा कोरोनाचा विळखा, कार्तिक आर्यनला दुसऱ्यांदा कोव्हीडची लागण

बॉलिवूडला पुन्हा कोरोनाचा विळखा, कार्तिक आर्यनला दुसऱ्यांदा कोव्हीडची लागण

कार्तिकनं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती दिली आहे की, त्याला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे.

कार्तिकनं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती दिली आहे की, त्याला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे.

कार्तिकनं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती दिली आहे की, त्याला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 4 जून- Kartik Aaryan Covid 19 Positive:  बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan)  ‘भूल भुलैया 2’ (Bhool Bhulaiyaa 2)  सिनेमा सध्या सगळीकडं धुमाकूळ घालत आहे. अशातच त्याच्यासंबंधीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  कार्तिकनं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती दिली आहे की, त्याला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे.  एक फोटो शेअर करत त्याने कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.

कार्तिक आर्यन याने त्याचा एक फोटो इन्स्टावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'सगळं एवढं पॉझिटिव्ह सुरू होतं की, त्यामुळे कोरोनाला देखील राहावलं नाही..असं म्हणत त्याने त्याला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

कार्तिकला झाला दुसऱ्यांदा कोरोना

कार्तिकला याआधी देखील कोरोनाची लागण झाली होती. भूल भुलैय्या-2 च्या शूटिंग दरम्यान कार्तिकला कोरोनाची लागण झाली होती. पण नंतर कार्तिकचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. लवकर कार्तिकचा शहजादा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

वाचा-'तरुण दिसण्यासाठी मी विष्ठासुद्धा खाईन'; अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य

सध्या कर्तिक आर्यन त्याच्या भूल भुलैया 2 या सिनेमामुळे सगळीकडं चर्चेत आहे. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.  दोन आठवड्यात या सिनेमानं 137 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.  या सिनेमात कार्तिक आर्यनसोबत कियार अडवामी, तब्बू  यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  सिनेमा रिलीज झाल्यानंतर देखील कार्तिकनं या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये चांगलीच मेहनत घेताना दिसत आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Vaccinated for covid 19