जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मराठमोळ्या दिग्दर्शकानं कार्तिक-कियाराला पुन्हा आणलं एकत्र; 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

मराठमोळ्या दिग्दर्शकानं कार्तिक-कियाराला पुन्हा आणलं एकत्र; 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

मराठमोळ्या दिग्दर्शकानं कार्तिक-कियाराला पुन्हा आणलं एकत्र; 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी ही जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शकानं केलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 ऑगस्ट : ‘भुलभुलैया 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाल केलेली पहायला मिळाली. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी ही जोडी झळकली होती. दोघांनीही आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. अशातच ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार असून प्रेश्रकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात दोघे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळ्या दिग्दर्शकानं केलं आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी केलं आहे. समीर विद्वांस दिग्दर्शित, साजिद नाडियादवालाचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सत्यप्रेम की कथा’ 29 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी दुसऱ्यांदा एकमेकांसोबत पडद्यावर दिसणार आहेत. समीर विद्वांसमुळे हा चित्रपट आणखीनच चर्चेचा विषय ठरत आहे. हेही वाचा -  Kalsutra: ‘एक चित्तथरारक माईंड गेम’,सुबोध भावेच्या पहिल्या मराठी वेबसीरिजचं पोस्टर रिलीज मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून समीर विद्वांस यांना ओळखलं जातं. ‘धुराळा’, ‘आनंदी गोपाळ’ यांसारख्या मराठीतील सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय त्यांनी ‘समांतर 2’साठी दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटासाठी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. आता सत्यप्रेम की कथा मुळे ते मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहेत. दरम्यान, ‘सत्यप्रेम की कथा’ ही एक संगीतमय प्रेमकथा आहे. शूटिंगच्या सुरुवातीपासून हा चित्रपट सतत चर्चेत आहे. आता या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ असणार आहे. त्यामुळे दोन्हीपैकी कोणता चित्रपट प्रेक्षकांना जास्त भुरळ पाडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात