मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Ved Box Office Collection: भावा तूच! 'पठाण'च्या धमाक्यात 'वेड'ची क्रेझ कायम; चौथ्या आठ्वड्यात कमाईचा आकडा थक्क करणारा
Ved Box Office Collection: भावा तूच! 'पठाण'च्या धमाक्यात 'वेड'ची क्रेझ कायम; चौथ्या आठ्वड्यात कमाईचा आकडा थक्क करणारा
बॉलिवूडचा किंग अर्थातच अभिनेता शाहरुख खानचा 'पठाण' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशातच आता अभिनेता रितेश देशमुखच्या 'वेड' चित्रपटाचं काय झालं? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. पाहूया वेडची बॉक्स ऑफिसवर घोडदौड कशी सुरु आहे.

2/ 8
मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या 'वेड' या मराठी सिनेमाने रिलीजपासूनच हवा केली आहे.
3/ 8
रितेश देशमुखचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा आहे. अभिनेत्याने या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे.
4/ 8
तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून जिनिलिया देशमुखने तब्बल दहा वर्षानंतर पडद्यावर पुनरागमन तर केलंच शिवाय तिने अभिनेत्री म्हणून मराठीत पदार्पण केलं आहे.
5/ 8
या मराठमोळ्या जोडीने वेडच्या माध्यमातून प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे.
6/ 8
या सिनेमाने काही दिवसांपूर्वी 50 कोटींचा आकडा पार करत रेकॉर्ड स्थापित केला आहे.
7/ 8
दरम्यान पठाणच्या दबदब्यातदेखील हा सिनेमा स्थिर उभा आहे. शाहरुखच्या चित्रपटाचा वेडवर फारसा परिणाम झालेला नाहीय,.
8/ 8
वेड चित्रपटाने चौथ्या आठवड्यात 6.11 कोटींची कमाई केली आहे. वेड चित्रपटाने एकूण तब्बल 57.15 कोटींचा गल्ला जमवला आहे.