मुंबई, 28 मे- बॉलिवूडमध्ये लव्हस्टोरी जितक्या चर्चेत असतात तितक्याच ब्रेकअप आणि घटस्फोटाच्या चर्चादेखील होत असतात. इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी यशाच्या शिखरावर असताना संसार थाटण्याचा संसार घेतला, मात्र दुर्दैवाने काहींचं लग्न अयशस्वी ठरलं आणि त्यांना एकटं आयुष्य जगावं लागत आहे. यामध्ये अभिनेत्री करिश्मा कपूर चासुद्धा समावेश होतो. करिश्मा सध्या सिंगल मदर म्हणून आयुष्य जगत आहे. दरम्यान अभिनेत्री आपला एक्स पती संजय कपूरसोबत दिसून आली. या दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करिश्मा कपूर ही 90 च्या काळातील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. करिश्माने अनेक सुपरहिट चित्रपट देत हे स्टारडम मिळवलं आहे. कपूर कुटुंबाची लेक असूनसुद्धा करिश्माने आपली स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. करिश्माने त्याकाळातील जवळपास सर्वच दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. अभिनेत्रीने डान्स, दमदार अभिनय आणि आपल्या सौंदर्याच्या जोरावर सर्वांनाच वेड लावलं होतं. आजही करिश्मा तितकीच सुंदर आणि फिट आहे. (हे वाचा: Parineeti-Raghav: परिणीतीसोबत साखरपुडा करण्याआधी राघवने केलेली नाकाची सर्जरी, असा झाला खुलासा ) करिश्मा कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असते.करिश्मा कपूरचं व्यावसायिक आयुष्य जितकं सुंदर होतं तितकंच खाजगी आयुष्य वाईट होतं. अभिनेत्रीने लग्न करत संसार होता मात्र तिला वैवाहिक आयुष्याचं सुख फार काळ लाभलं नाही. अभिनेत्रीनं पतीवर अनेक गंभीर आरोप करत घटस्फोट घेतला होता.
दरम्यान आता करिश्मा कपूर इतक्या वर्षानंतर आपल्या एक्स पतीसोबत दिसून आल्याने चर्चांना उधाण आलं आहे. विरल भयानीने नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये करिश्मा कपूर आपला एक्स पती संजय कपूरसोबत दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये करिश्मा एका रेस्टोरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. लगेचच त्याच्या पाठोपाठ तिचा एक्स पती संजय कपूरसुद्धा रेस्टोरंटमधून बाहेर येताना दिसत आहे. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. आपल्या मुलांसाठी एकत्र आल्याची चर्चा या व्हिडीओवरुन केली जात आहे. तर काहींनी घटस्फोट घेतल्यांनंतर एकत्र येण्यात काय अर्थ? म्हणत टीकासुद्धा केली आहे.
करिश्मा कपूर-संजय कपूर लग्न- अभिषेक बच्चनसोबत साखरपुडा मोडल्यावर लगेचच करिश्माचं लग्न बिझनेसमन संजय कपूरशी ठरवण्यात आलं. 2003 मध्ये या दोघांचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं. मात्र लग्नाच्या अवघ्या 7 वर्षांतच या दोघांचा घटस्फोट झाला. 2010 ला करिश्मा आपल्या मुलांना घेऊन माहेरी निघून आली. संजय आणि करिश्मा यांच्या घटस्फोटाची केस सुद्धा बराच काळ चालली. दरम्यानच्या काळात दोघांनीही एकमेकांवर बरेच गंभीर आरोप केले. करिश्मानं संजयच्या कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या तसेच तिला मानसिक त्रास दिल्याचा आरोपही केला होता.