बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चड्ढा यांनी नुकतंच साखरपुडा उरकला आहे. या दोघांनी आपलं नातं अधिकृत करत सर्वांनाच खुश केलं आहे.
दरम्यान अभिनेत्री परिणितीचा होणारा नवरा राघव चड्ढाबाबत एक माहिती समोर आली आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, राघव चड्ढाने आपल्या नाकाची सर्जरी केल्याचं सांगितलं जात आहे.
या रिपोर्ट्सनुसार, सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये राघव परिणितीच्या कुटुंबातील एका महिलेसोबत संवाद साधताना दिसला होता.
या व्हिडीओमध्ये ती महिला राघवला विचारते तुझ्या नाकात काहीतरी बदल दिसत आहे. काही केलं आहेस का? यावर राघव हो असं सांगतो.
राघव सांगतो, माझी नाक मला माझ्या बाबांसारखी हवी होती त्यामुळे मी सर्जरी करुन घेतली आहे. दरम्यान परिणीती त्याला आजूबाजूला कॅमेरे असल्याचं सांगत खुणावते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरुन डिलीट करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाच्या साखरपुड्यानंतर आता चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून आहे.