कपूर कुटुंबातली मुलगी आणि 90 च्या दशकातली सर्वात लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूर हल्ली चित्रपटांपासून दूर असली तरी ती नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही करिश्मा अनेकदा तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. वयाच्या 47 व्या वर्षीही करिश्मा सुपर फिट आहे आणि तिच्या स्टायलिश लुकने चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. आता करिश्माने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यासाठी चाहत्यांकडून तिचं खूप कौतुक होत आहे. (फोटो: Instagram: @therealkarismakapoor)
या फोटोंमध्ये करिश्मा कपूरचा बॉसलेडी लूक दिसत आहे, ज्याला चाहत्यांनी पसंती दिली आहे. (फोटो : Instagram: @therealkarismakapoor)
फोटोंमध्ये, करिश्मा कपूर काळ्या आणि गुलाबी कॉम्बिनेशन ड्रेसमध्ये दिसत आहे आणि तिने स्पोर्ट्स शूजसह तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @therealkarismakapoor)
करिश्माच्या या लुकने चाहत्यांमध्ये हवा केली आहे. यूजर्स तिचं कौतुक करत आहेत. (फोटो : Instagram: @therealkarismakapoor)
अनेक यूजर्सचे म्हणणं आहे की, करिश्मा 3 वर्षांनंतर तिचा 50 वा वाढदिवस साजरा करणार असली तरी, तिच्याकडे पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. (फोटो : Instagram: @therealkarismakapoor)
करिश्माने तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकने चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट आणली आहे. (फोटो : Instagram: @therealkarismakapoor)
जेव्हा ती स्वतःचा नवीन फोटो शेअर करते तेव्हा तिचे चाहते तिचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. (फोटो : Instagram: @therealkarismakapoor)