मुंबई, 09 जानेवारी: 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय मालिका ‘करिश्मा का करिश्मा’ जवळपास सर्वांच्याच लक्षात असेल. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा बालकलाकार झनक शुक्ला त्या काळात घराघरात लोकप्रिय झाली होती. झनक शुक्लाला 90 च्या दशकातील मुले करिश्मा याच नावाने ओळखत होते. अभिनेत्रीने ‘करिश्मा का करिश्मा’ सोबतच शाहरुख खान सोबत ‘कल हो ना हो’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एवढ्या दिवसांनंतर ही करिश्मा पुन्हा चर्चेत आली आहे. त्याचं कारण म्हणजे अलीकडेच या अभिनेत्रीचा साखरपुडा झाला आहे. 26 वर्षीय झनक शुक्लाने तिचा खूप वर्षांपूर्वीपासूनचा बॉयफ्रेंड स्वप्निल सूर्यवंशी याच्यासोबत साखरपुडा केला आहे. झनकने नुकतेच इंस्टाग्रामवर तिच्या एंगेजमेंटचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलं आहे कि, ‘फायनली आम्ही एकत्र आलो आहोत. रोका झाला’ झनकच्या या पोस्टवर त्याच्या सहकलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सृती झा, कंवर ढिल्लन, मोहित हिरानंदानी, अविका गोर यांच्यासह अनेकांनी या पोस्टवर कमेंट करून शुभेच्छा दिल्या. झनक शुक्लाने शाहरुखच्या कल हो ना हो या चित्रपटात काम केले होते. याशिवाय ती ‘वन नाइट विथ द किंग’ या हॉलिवूड चित्रपटातही दिसली आहे. हेही वाचा - Akshay Kelkar : रिक्षावाल्याचा मुलगा ते बिग बॉसचा विजेता; अक्षयनं सार्थकी ठरवले गर्लफ्रेंडचे ‘ते’ शब्द झनक स्वप्निल सोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. स्वप्नील हा एक इंजिनिअर आहे. आता या दोघांच्या एंगेजमेंटचे फोटो व्हायरल झाले असून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
अभिनेत्रीने वयाच्या 15 व्या वर्षी अभिनयातून ब्रेक घेतला होता.याविषयी ती म्हणाली होती कि, तिला आता अभिनय करायचा नाहीये.’ ती म्हणाली की, ‘मी लहानपणी खूप काम केले आहे. पण आता मला फक्त मजा करायची आहे.’ तिने सांगितले की ती नियमित शाळेत जायची, गृहपाठ आणि इतर सर्व काही करायचे, ते खूप चांगले आहे. परंतु कामामुळे लहानपण मी गमावत होते, म्हणून माझ्या पालकांनी मला इंडस्ट्रीतून बाहेर निघण्याचा सल्ला दिला. झनकने सांगितले की, लहानपणी ती सर्वांमध्ये मिसळायची. पण आता मी पूर्णपणे उलट आहे. त्याने सांगितले की ती खूप गप्प राहते. झनकने सांगितले की बरेच लोक त्याच्याकडे येतात आणि तिने प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला आहे.
त्याचबरोबर झनकने सांगितले की, कधीकधी तिला वाईट वाटते की जर ती अभिनय करत असेल तर ती पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाही. मोकळे राहून रस्त्यावर फिरायला आवडते, पण एक अभिनेत्री असताना तुम्हाला ते करता येत नाही.’ असे ती म्हणाली होती.