मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कारगिल वीरांच्या सन्मानाने होणार KBC चा समारोप

कारगिल वीरांच्या सन्मानाने होणार KBC चा समारोप

केबीसी (KBC) 12 चा समारोप कारगिलचे हिरो सुभेदार मेजर योगेंद्रसिंग यादव (Yogendra Singh Yadav) आणि सुभेदार संजय सिंह (Sanjay Singh) यांच्या सन्मानार्थ होईल. परमवीर चक्र विजेता हे दोन नायक केबीसी 12 ग्रँड फिनाले मधील खास पाहुणे असतील.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 17 जानेवारी: 3 जुलै 2000ला कौन बनेगा करोडपती हा शो प्रेक्षकांच्या भेटीस आला.   कार्यक्रमाचं स्वरूप आणि महत्वाचं म्हणजे होस्ट अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) असल्यामुळे या शो ला घराघरातून मोठी पसंती मिळाली.  20 वर्षात घराघरात पोचलेल्या या लोकप्रिय कार्यक्रमाला आता अलविदा करण्याची वेळ आली आहे. सध्या KBC चा 12वा सीझन आपण बघत होतो. KBC हा इंडियन टेलिव्हीजन (Indian Television) वर लॉन्ग टाइम प्रदर्शित झालेल्या कार्यक्रमांपैकी एक आहे.

15 जानेवारी रोजी सैन्य दिनानिमित्त सोनी टीव्हीने (Sony TV) केबीसीचा एक खास प्रोमो जारी केला आहे. ज्यात  कारगिल हीरो सुभेदार मेजर योगेंद्रसिंग यादव (Yogendra Singh Yadav) आणि सुभेदार संजय सिंग (Sanjay Singh) यांच्या सन्मानाने केबीसी 12 चा समारोप होईल, असे सांगण्यात आले आहे. परमवीर चक्र विजेता असलेले हे दोन्ही नायक केबीसी 12 च्या ग्रँड फिनाले भागातील खास पाहुणे असतील. दोन्ही वीर अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर (Hot Seat) बसतील.

प्रोमोसह सोनी टीव्हीने त्याच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम (Instagram) हँडलवर आर्मी ट्यूनचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी  त्यांनी लिहलं आहे की, 'आम्ही भारतीय सैन्याला  सलाम करतो! सैन्य लष्करी बँडच्या संगीतामुळे भारतीय सैनिकांचा आत्मविश्वास वाढतो आणि सैन्यासाठी जीवन जगण्याची प्रेरणा देतो. हे संगीत आपल्या प्रत्येकामध्ये अभिमान आणि देशप्रेमाची भावना जागृत करते. या व्हिडिओत सैनिक  सैन्य ट्यूनसह त्यांच्या ड्रेसमध्ये KBC च्या स्टुडिओत परेड करताना दिसत आहेत.

कौन बनेगा करोडपतीचा 12 वा सीझन 22 जानेवारी रोजी संपत आहे. या खास प्रसंगी, कारगिलच्या युद्धाचे दोन्ही योद्धा kbc हॉट सीटवर बसतील. KBC चा पुढला सिझन येईल हे नक्की मात्र  पुढच्या सीझनमध्ये अमिताभ शो होस्ट करणार नाहीत असे त्यांनी नुकतंच ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. म्हणूनच KBC चा हा शेवटचा एपिसोड प्रत्येक प्रेक्षकांसाठी विशेष असणार आहे.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Bollywood, Indian army, KBC, Reality show, Sony tv