मुंबई, 24 एप्रिल- बॉलिवूड (Bollywood) कलाकार जितके प्रसिद्ध असतात, तितकीच त्यांची मुलंदेखील प्रसिद्धीत असतात. गेल्या काही वर्षांत अनेक स्टारकिड्स (Starkids) लोकप्रिय झाले आहेत. तैमूर अली खान (Taimur Ali Khan) बी-टाऊनमधील सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. करिना कपूर खान आणि सैफ अली खान (Kareena Kapoor-Saif Ali Khan) यांच्यासोबतच सोशल मीडियावर त्याचे फॅन फॉलोअर्सही खूप आहेत. तो कुठेही गेला तरी मीडियाचे कॅमेरे त्याचा पाठलाग करत असतात. पण लहान मुलं कधी काय करतील याचा काही नेम नाही. अनेकवेळा लहान मुलांना नकला करण्यात मजा येते.आपल्या मोठ्या लोकांना पाहून ते सुद्धा जसंच्या तसं करण्याचा प्रयत्न करतात. आज तैमूरसोबतसुद्धा असंच काहीसं झालं. दरम्यान हा चिमुकला पापाराझींमुळे खूप नाराज दिसत होता.त्यांनतर त्याने जे केलं ते पाहून सर्वच चकित झाले आहेत. सध्या तैमूरचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये करिना, तैमूर आणि चिमुकला जेह त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घराबाहेर खेळताना दिसत आहेत. यादरम्यान पापाराझी त्याचे फोटो क्लिक करत होते. व्हिडिओमध्ये, करिना कपूर खान बाहेर येता पापाराझींना व्हिडिओ आणि फोटो क्लिक करण्यास नकार देताना दिसत आहे. आई करिनाला पाहून तैमूरही तिची नक्कल करत ‘बंद कर दादा, आता बंद कर’ असं मीडियाला बोलताना दिसत आहे. एकीकडे तैमूर इकडे-तिकडे फिरत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर करिनाला त्याला आत घेऊन जायचं आहे. दुसरीकडे जेह अली खान त्याच्या नवीन छोट्या बीएमडब्ल्यूमध्ये बसलेला दिसत आहे. जेव्हा तैमूर करिनाची नक्कल करत पापाराझींना सांगतो की ‘हे थांबवा. बंद कर दादा, बंद करा आता…’, तेव्हा करिना त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
करिना कपूरच्या चाहत्यांना तैमूरचा हा व्हिडीओ क्युट वाटत आहे. तर इतर युजर्सना तो उद्धट वाटत आहे. त्यामुळे या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले, ‘अद्भुत.’ दुसऱ्याने लिहिले, ‘क्यूट’. त्याचवेळी आणखी एका युजरने म्हटले की, ‘त्याला लहानपणापासून मीडियाचा त्रास आहे.’ तर काही युजर्सनी लिहिले, ‘हा आईसारखाच उद्धट आहे’. दुसऱ्याने लिहिले, ‘आत्तापासूनच मीडियासोबत अशी वर्तवणूक’. हा व्हिडीओ मात्र चर्चेत आला आहे.