• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • PHOTO: असा दिसतो छोटा नवाब; पाहा करीनाच्या दुसऱ्या बाळाची पहिली झलक

PHOTO: असा दिसतो छोटा नवाब; पाहा करीनाच्या दुसऱ्या बाळाची पहिली झलक

पहिल्यांदाच करीनानं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या लहान मुलाचा चेहरा दिसत (Kareena Kapoor Shares First Picture of Her Baby Boy) आहे. या फोटोमध्ये तैमूर आपल्या लहान भावाला मांडीवर घेऊन बसल्याचं दिसत आहे.

 • Share this:
  मुंबई 09 मे: आज मदर्स डेच्या (Mothers Day) निमित्तानं अनेक बॉलिवूड कलाकारांनी (Bollywood Celebrities) आपल्या आईचे आणि काही सेलिब्रिटी मदर्सनं आपल्या मुलांसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. यात बॉलिवूडची बेबो करीनादेखील मागे नाही. याच दिवसाचं औचित्य साधत करीनानं आपल्या दोन्ही मुलांचा एक फोटो शेअर केला आहे. पहिल्यांदाच करीनानं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या लहान मुलाचा चेहरा दिसत (Kareena Kapoor Shares First Picture of Her Baby Boy) आहे. या फोटोमध्ये तैमूर आपल्या लहान भावाला मांडीवर घेऊन बसल्याचं दिसत आहे. या फोटोला अभिनेत्रीनं खास कॅप्शनही दिलं आहे. यात तिनं म्हटलं, की आशावरच जग कायम आहे आणि हे दोघंही एका चांगल्या दिवसासाठीची आशा मला देतात. तुम्हा सर्व सुंदर आणि भक्कम मातांना मदर्स डेच्या शुभेच्छा! विश्वास ठेवा.
  करीनाचे चाहते मागील अनेक दिवसांपासून तिच्या लहान मुलाचा चेहरा पाहाण्यासाठी उत्सुक होते. अशा मदर्स डेच्या निमित्तानं करीनानं बाळाचा फोटो शेअर केल्यानं चाहत्यांनाही आनंद झाला आहे. करीना आणि सैफ अली खाननं आतापर्यंत या चिमुकल्याचं नाव जाहीर केलेलं नाही करीनानं याआधीही आपल्या लहान मुलाचा एक फोटो शेअर केला होता. यात सैफ अली खान आणि तैमूर त्याला खेळवत होते. मात्र, यात त्याचा चेहरा दिसत नव्हता. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं होतं, माझा विकेण्ड असा असतो...तुमचा कसा आहे? काही दिवसांपूर्वीच करीनाचे वडील रणधीर कपूर यांच्या अकाऊंटवरुन एका बाळाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यांना दोन फोटो कोलाज करुन फोटो पोस्ट केला मात्र काहीच वेळात ही पोस्ट डिलीट केली गेली. अशी चर्चा रंगली होती, की हा फोटो करीना आणि तिच्या लहान मुलाचा होता.
  Published by:Kiran Pharate
  First published: