मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /तैमूरसोबत बेडवर बसून 'हे' काम करत होता सैफ; पत्नी करिनानेच फोटो केला VIRAL

तैमूरसोबत बेडवर बसून 'हे' काम करत होता सैफ; पत्नी करिनानेच फोटो केला VIRAL

   'बेबो'   (Beboo)  अर्थातच करिना कपूर   (Kareena Kapoor)  सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवनवीन पोस्ट शेअर करून चाहत्यांचं लक्ष वेधत असते.

'बेबो' (Beboo) अर्थातच करिना कपूर (Kareena Kapoor) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवनवीन पोस्ट शेअर करून चाहत्यांचं लक्ष वेधत असते.

'बेबो' (Beboo) अर्थातच करिना कपूर (Kareena Kapoor) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवनवीन पोस्ट शेअर करून चाहत्यांचं लक्ष वेधत असते.

मुंबई, 30 डिसेंबर-   'बेबो'   (Beboo)  अर्थातच करिना कपूर   (Kareena Kapoor)  सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवनवीन पोस्ट शेअर करून चाहत्यांचं लक्ष वेधत असते. करिना बऱ्याचदा आपल्या पती आणि मुलांसोबतचे मजेशीर फोटो शेअर करत असते. नुकताच करिना कपूरने असाच एक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिनं आपली सकाळ कशी असते याबद्दल खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरने काहीवेळीपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर  (Instagram Post)  केला आहे. हा फोटो फारच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये अभिनेता आणि करिनाचा पती सैफ अली खान  (Saif Ali Khan)   बेडवर बसलेला दिसत आहे. त्याच्या समोर ब्रेकफास्ट ठेवलेला दिसत आहे. याचाच अर्थ सैफ ब्रेकफास्ट करत आहे. तर त्याला लागूनच मुलगा तैमूर  (Taimur Ali Khan) अभ्यास करत असेलला दिसत आहे. खरं तर तो एखादं चित्र काढताना दिसून येत आहे. करिनाने हा फोटो शेअर करत त्याला मजेशीर कॅप्शन दिलं आहे. करिनाने लिहिलं आहे, 'माझी सकाळ... सैफ- बेबो काय तू इन्स्टाग्रामसाठी आणखी एक फोटो घेत आहेस... मी-हम्म्म्म्म क्लिक... असं मजेशीर कॅप्शन लिहीत करिनाने सर्वांचीच सकाळ खास बनवली आहे. सोबतच करिनाने सैफ आणि टीम टीम हा हॅशटॅगसुद्धा दिला आहे.

करिना कपूर आपल्या पती आणि मुलांसोबत सतत मजेशीर गोष्टी करताना दिसून येते. चाहतेसुद्धा तिच्या या गोष्टींचं कौतुक करत असतात. तर अनेकवेळा नेटकरी तिच्या मुलांना टोमणे देत असतात. मात्र यासर्व गोष्टींना दूर ठेऊन करिना आणि सैफ आपल्या मुलांसोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घेताना दिसून येतात. करिना आणि सैफ सध्या दोन मुलांचे आईवडील आहे. त्यांचा मोठा मुलगा तैमूर आणि लहान जेह आहे. तैमूर सुरुवातीपासूनच एक फेमस स्टारकिड आहे. आतापासूनच सोशल मीडियावर त्याची चर्चा असते. तर जेहलासुद्धा अशीच प्रसिद्धी मिळाली आहे.करिना सतत आपल्या मुलांसोबत कॅमेरात कैद होते. काही दिवसांपूर्वी करिना आणि सैफ आपल्या दोन्ही मुलांसोबत मालदीव व्हेकेशनला गेले होते.

(हे वाचा:PHOTO: अमिताभ बच्चन यांची नात पुन्हा चर्चेत! घेतेय दिल्लीतील थंडीचा आनंद )

नुकताच करिना कपूरने कोरोनावर मात केली आहे. त्याकाळात ती आपल्या पती आणि मुलांपासून दूर आयसोलेशनमध्ये होती. तिला सतत आपल्या मुलांची आठवण येत होती. तिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबद्दल सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर तैमूरचा नुकताच ५ वाढदिवस पार पडला यावेळी सुद्धा करिना आपल्या मुलाला भेटू शकली नाही. परंतु आयसोलेशनमधून बाहेर आल्यानंतर ती आपल्या मुलांसोबत ख्रिसमस पार्टीत सहभागी झाली होती.

First published:

Tags: Entertainment, Kareena Kapoor, Saif Ali Khan, Taimur ali khan