• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • The Incarnation – Sita चा वाद! Happy Birthday Most... कंगनाने करीनाला शुभेच्छा देताना काय शब्द वापरलाय पाहा

The Incarnation – Sita चा वाद! Happy Birthday Most... कंगनाने करीनाला शुभेच्छा देताना काय शब्द वापरलाय पाहा

अभिनेत्री कंगना राणावत आणि करीना कपूर खान या दोघींच्यात 'द इनकार्नेशन- सीता' (The Incarnation – Sita) या सिनेमातील सिनेमाच्या देवी सीतेच्या भूमिकेवरून बिनसल्याची चर्चा होती. अशातच करीनाला (Kareena Kapoor Khan Birthday) कंगनाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 • Share this:
  मुंबई, 21 सप्टेंबर 2021 ; बॉलीवूडची बेबो म्हणजे अभिनेत्री करीना कपूर खानचा (Kareena Kapoor Khan Birthday) आज वाढदिवस आहे. आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी करीना सध्या पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूर अली खान व जहांगीर अली खान यांच्यासोबत मालदीवला गेली आहे. चाहत्यांकडून करीनावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यासोबतच काही बॉलिवूड कलाकारांनी देखील करीनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री कंगना राणावतने देखील करीनाल (Kangana Ranaut Wish Kareena) वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एकेकाळी करीनावर घराणेशाहीवरून टीका करणाऱ्या कंगानाने करीनाला वाढदिवासाच्या दिेलेल्या शुभेच्छामुळे सर्वांचे भुवया उंचावल्या आहेत. कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीला करीनाच्या काही फोटोंचे कोलाज लावले आहे. या फोटोंमध्ये करीनाचे वेगवेळे लूक पाहायला मिळत आहेत. ”हॅप्पी बर्थडे मोस्ट गोर्जियस” , अशा शब्दात कंगनाने करीनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे मागच्या काही दिवसात दोघींच्यात काही तरी बिनसले असल्याचे समोर आले होते. वाचा : या बॉलिवूड कलाकारांच्या पत्नी कमाईच्या बाबतीत आहेत त्यांच्या पेक्षाही एक पाऊल पुढे ‘द इनकार्नेशन- सीता’ (The Incarnation – Sita) या सिनेमात करीना सीतेची भूमिका साकरणार होती. मात्र काही कारणाने ही भूमिका कंगनाला मिळाली. यापूर्वी ही भूमिका दीपिका पदुकोण साकारणार असल्याची माहिती देखील समोर आली होती. करीनाने ही भूमिका करण्यासाठी 12 कोटी मागितले होते. यासाठी करीनाला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ट्रोल देखील केले होते. यावरूनच कंगना आणि करीनामध्ये काही बिनसल्याची बी टाऊनमध्ये चर्चा होती. त्यानंतर आता कंगनाने दिलेल्या शुभेच्छामुळे सर्वांच्या भुवया उंचवाल्या आहेत. करीना यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. स्क्रीनप्ले राईटर मनोज मुंतशीरने एका मुलाखतीमध्ये याबद्दल माहिती दिली होती की, कंगना राणावत या भूमिकेसाठी आमची पहिली पसंद होती. तसेच या भूमिकेसाठी करीना आणि दीपिकाल अॅप्रोच करण्यात आल्यामध्ये कसलेच सत्य नसल्याचे म्हटले होते. या भूमिकेसाठी जे स्केच बनवण्यात आले आहे त्यामध्ये कंगना फीट बसत असल्याचे सांगत, देवी सीतेच्या भूमिकेसाठी कंगनाच योग्य असल्याचे म्हटले होते.
  Published by:News18 Trending Desk
  First published: