बॉलिवूड कलाकारांच्या पत्नी स्वतःला नेहमीच कॅमेऱ्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच त्यांना या ग्लॅमरस पासून दूर राहून आपलं आयुष्य जगायला आवडतं. मात्र त्यांच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर त्या कमाईमध्ये आपल्या पतीलासुद्धा टक्कर देत असतात. आज आपण अशाच काही स्टार कपलविषयी पाहणार आहोत.
बॉलिवूड किंग अर्थातच शाहरुख खान कमाईमध्ये नेहमीच सर्वांच्या पुढे असतो. मात्र याबाबतीत त्याची पत्नीसुद्धा अजिबात मागे नाही. पत्नी गौरी एक निर्माती तर आहेच शिवाय ती एक प्रसिद्ध इंटेरियर डिझायनर आहे. यामध्ये ती कोटींची कमाई करते. तसेच गौरीने मुकेश अंबानी, Roberto Cavalli आणि Ralph Lauren सारख्या मोठ-मोठ्या लोकांच्या इंटेरियर डिझाईनचं काम केलं आहे.
या लिस्टमध्ये बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारच्या पत्नीचासुद्धा नंबर लागतो. अक्षयची पत्नी अर्थातच अभिनेत्री ट्विंकल खन्ना एक प्रसिद्ध इंटेरियर डिझायनर आहे. तसेच ती लेखिकासुद्धा आहे. लग्नानंतर अभिनयापासून दुसरं असलेली ट्विंकल या बिझनेसमधून कोट्यवधींची कमाई करते. त्यामुळे ती कमाईत आपल्या पतीलासुद्धा टक्कर देते.
शाहिद कपूरची पत्नी मीरा रजपूतसुद्धा नेहमीच चर्चेत असते. कोरोना महामारीदरम्यान मीरा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रिय होती. ती अनेक गरजूंना मदतदेखील करत होती. मीराला ब्युटी आणि हेल्थबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती आहे. तसेच ती उत्तम पियानो वादक आहे.
अभिनेता जॉन अब्राहम नेहमीच आपल्या पर्सनल लाईफला लामलाईट पासून दूर ठेवणं पसंत करतो. जॉनने २०१४ मध्ये प्रिया रुंचालसोबत लग्न केलं आहे. प्रिया ही एक बँकर आहे. तसेच ती फायनांशिअल अड्वायझर आहे. प्रियाची कमाईसुद्धा खूप मोठी आहे.
अभिनेता सोहेल खानची पत्नी आणि सलमान खानची वहिनी सीमा खानसुद्धा कमाईच्या बाबतीत फार पुढे आहे. सीमा खान एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. शिवाय ती मुंबईत बांद्रामध्ये एक मोठं नामांकित बुटीकसुद्धा चालवते.
अभिनेता बॉबी देओलची पत्नी आणि धर्मेंद्र यांची सून तान्या हि एका फार मोठ्या उद्योगपती कुटुंबातील मुलगी आहे. ती स्वतः एक इंटेरियर डिझायनर आहे. तसेच ती होम डेकोरेशनचं काम पाहाते.
अभिनेता सुनील शेट्टीची पत्नी पत्नी एक नामंकित उद्योजिका आहे. ती लाईफस्टाईल संबंधित एक स्टोअरसुद्धा चालवते. तसेच ती रियल इस्टेटच्या व्यवसायाशीदेखील संबंधित आहे.