मुंबई, 17 ऑगस्ट- बॉलिवूडचे फक्त कलाकारच नव्हे तर काही दिग्दर्शकसुद्धा आहेत, जे सतत चर्चेत असतात. या यादीमध्ये अनुराग कश्यप यांचादेखील समावेश होतो. अनुराग कश्यप हे हिंदी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. अनुराग हे फक्त आपल्या चित्रपटांमुळेच नव्हे तर आपल्या खाजगी आयुष्यामुळेसुद्धा चर्चेत असतात. नुकतंच अनुराग यांनी आपल्या एक्स पत्नींसोबतचा फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अनुराग कश्यप हे बॉलिवूडमधील असे दिग्दर्शक आहेत जे कोणत्याही विषयावर परखडपणे आपलं मत व्यक्त करतात. अनुराग यांचा हा बिनधास्त अंदाज अनेकांना पसंत पडतो. तर कधीकधी त्यांचा हा स्वभाव अनेकांना खटकतो.बऱ्याचवेळा त्यांना आपल्या वक्तव्यांमुळे ट्रोलिंगचा सामनादेखील करावा लागला आहे. परंतु तरीदेखील अनुराग कश्यप हे आपल्या बिनधास्त अंदाजावर ठाम असतात. सध्या ते आपल्या एक्स पत्नींमुळे चर्चेत आले आहेत. अनुराग कश्यप हे सध्या आपल्या ‘दोबारा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. त्यांच्या या आगामी चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान अनुराग यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो भुवय्या उंचावल्या आहेत. तर अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. या फोटोमध्ये अनुराग आपल्या एक्स पत्नी आरती बजाज आणि कल्की कोचलीनसोबत दिसून येत आहेत. या दोघींसोबत त्यांनी बिनधास्त पोज दिली आहे.परंतु त्यांनी दिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या कॅप्शन देत त्यांना, ‘माझे दोन आधारस्तंभ’ असं लिहलं आहे.
आरती-अनुराग लग्न- अनुराग कश्यप आणि आरती बजाज यांनी 1997 मध्ये लग्न केलं होतं. परंतु 12 वर्षाच्या संसारानंतर हे दोघे विभक्त झाले होते. या दोघांना आलिया कश्यप नावाची एक लेकसुद्धा आहे ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. **(हे वाचा:** ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला करायचंय स्वयंवर; कार्तिक आर्यन ते विजय देवरकोंडा होणार सहभागी? ) कल्की-अनुराग लग्न- अनुराग आणि कल्कीने 2011 मध्ये लग्न केलं होतं. परंतु यांचं लग्नसुद्धा फार काळ टिकलं नाही. या दोघांनी 2015 मध्ये घटस्फोट घेतला होता.

)







