मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /निशाच्या जखमा पाहून दीपिका संतापली; करणवर केली जोरदार टीका

निशाच्या जखमा पाहून दीपिका संतापली; करणवर केली जोरदार टीका

‘ते रक्तच सागतंय कोण खरं बोलतंय अन् कोण खोटं’; निशा-करण वादात दीपिकाची उडी

‘ते रक्तच सागतंय कोण खरं बोलतंय अन् कोण खोटं’; निशा-करण वादात दीपिकाची उडी

‘ते रक्तच सागतंय कोण खरं बोलतंय अन् कोण खोटं’; निशा-करण वादात दीपिकाची उडी

मुंबई 4 मे: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याची पत्नी निशा रावल (Nisha Rawal) हिनं त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत. या प्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती. मात्र नंतर पुढे जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान या प्रकरणात इतर टीव्ही सेलिब्रिटींसोबतच आता अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी देखील उडी मारली आहे. (Dipika Chikhlia supports Nisha Rawal) ‘रामायण’ या मालिकेत सीतेची भूमिका साकारुन लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्रीनं करणबाबत संताप व्यक्त केला आहे.

झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत दीपिका यांनी करण-निशा वादावर भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “निशाला नक्कीच मारहाण झाली आहे. तिच्या शरीरावरील जखमा हा त्याचा पुरावा आहे. या अत्याचारामुळं ती मानसिकरित्या खचली आहे. खरं तर तिनं या पूर्वीच आवाज उठवायला हवा होता. तसं केलं असतं तर तिला हात लावण्याची हिंमत देखील करण करु शकला नसता. पण आता तिनं घाबरु नये. या लढाईत मी तिच्यासोबत आहे.” असं म्हणत दीपिका यांनी निशाची बाजू घेतली. व करणबाबत आपला राग व्यक्त केला.

या 10 अभिनेत्री लॉकडाउनमध्येही करतायेत कोट्यवधींची कमाई

निशा आणि करण एकमेकांवर करतायेत आरोप

करणवर केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा नीशा रावलने केला आहे. पती करण मेहराच्या फोनवर काही मसेज सापडल्यानंतर त्याच्या अफेअर बद्दल लक्षात आल्याचं ती म्हणाली. मात्र कुटुंब आणि मित्र परिवारापासून तिने सर्व गोष्टी लपवल्या. लग्न टिकणार नाही हे लक्षात आल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं निशा म्हणाली. घटस्फोटानंतरच्या पोटगी बाबबत त्यांच्यात चर्चा सुरू होती. दरम्यान करणनेही नीशावर काही आरोप केले आहेत. निशाने करणच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली असून त्यांना धमकावल्यचा आरोप करणने केलाय. निशाने पोटगीसाठी मोठी रक्कम मागितल्याचा दावा त्याने केलाय.

First published:
top videos

    Tags: Crime, Entertainment, Tv actress