मुंबई, 15 ऑक्टोबर : करण जोहर या ना त्या कारणामुळे कायम चर्चेत असतो. त्याचा ‘कॉफी विथ करण’ हा शो तर खूपच हिट ठरला. सोशल मीडियावर हा शो प्रचंड गाजला. करणं जोहर चित्रपटांव्यतिरिक्त वादांमुळेही चर्चेत असतो. करण काहीही करत नसला तरीही तो वादांचा भाग बनतो असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पण आता करणं वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. करण जोहरने शनिवारी इंस्टाग्रामवर त्याच्या मुलांसोबतच्या वीकेंडची एक झलक शेअर केली. त्या व्हिडिओमध्ये करणच्या मुलांनी त्याच्यासोबत असं काही केलं कि त्याची आता सगळीकडे चर्चा होतेय. करण जोहरने शनिवारी इंस्टाग्रामवर त्याच्या मुलांसोबतच्या वीकेंडची एक झलक शेअर केली. त्या क्लिपमध्ये करण जोहर दोन्ही मुलांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. त्याची मुले यश आणि रुही घरी खेळत होते. व्हिडीओच्या सुरुवातीला यश काहीतरी बोलताना दिसतो. करणने त्याला विचारले, ‘काय बोलत होतास? सॉरी.’ खेळण्यात व्यस्त असलेल्या यशने पापा करणला विचारले, ‘मी तुला टीव्हीवर पाहिले. तू एवढं वाईट का गात होतास?’ करणने विचारलं, ‘मी काय वाईट करतोय?’ यशने उत्तर दिलं, ‘तू वाईट गात होतास.’ हेही वाचा - Code Name Tiranga Collection: परिणीती चोप्राचे 11 वर्षात 9 फ्लॉप चित्रपट; ‘कोड नेम तिरंगा’ वर भविष्य अवलंबून करण जोहरने उत्तर दिले, ‘मी खूप छान गातो. दादाला वाटते की त्यांचा आवाज अप्रतिम आहे, पण मी सुंदर गातो. तुला माझे गाणे ऐकायचे आहे का?’’ दोन्ही मुलं द्विधा मनस्थितीत म्हणाली- ठीक आहे. त्यानंतर चित्रपट निर्मात्याने ‘अभी ना जाओ छोड कर’ गाणे सुरू केले. थोड्या वेळाने दोघांनीही कानावर हात ठेवले. करण त्यांना म्हणाला, ‘अरे ऐका ना.’ ते हसले, पण हात खाली केले नाहीत.
व्हिडिओ शेअर करताना करणने लिहिले की, ‘माझ्या घरात माझ्या गोड आवाजाचा कोणीही चाहता नाही.’ त्यावर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले ‘करण जोहर सर तुम्हाला गाण्याचे क्लास घेणे खरोखर आवश्यक आहे.’ तर दुसऱ्या चाहत्याने पोस्टवर लिहिले, ‘तुम्ही किती चांगले बाबा आहात.’
यश आणि रुहीने करणला त्याच्या गाण्यासाठी खिल्ली उडवण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा त्याने ‘ब्रह्मास्त्र’चे गाणे गाण्याचा प्रयत्न केला तेव्हासुद्धा त्याच्या मुलांनी ते गाणं ऐकण्यास नकार दिला होता. टेलिव्हिजनवरील बहुतेक रियालिटी शोमध्ये करणने अनेकदा गाणी गायली आहेत. नुकतेच त्याने परिणीती चोप्रासोबत ‘झलक दिखला जा’वर ‘आजा पिया तोहे प्यार दूं’ हे गाणे गायले. त्याने या वर्षाच्या सुरुवातीला ‘हुनरबाज: देश की शान’वर आशा भोसले यांचे ‘आँखों की मस्ती’ हे गाणे गायले होते. करणच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं तर त्याच्या पुढच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानी द्वारे दिग्दर्शक म्हणून परत पाहायला मिळणार आहे.