काजल अग्रवाल ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात महागडी आणि सुपरहिट अभिनेत्रींपैकी एक आहे.सध्या पडद्यापासून आपलं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत असलेली ही अभिनेत्री आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अभिनेत्रींच्या नेटवर्थवर एक नजर टाकूया.
अभिनेत्रीने चित्रपटांमध्ये काम करण्याआधी काही जाहिरातींमध्येसुद्धा काम केलं आहे. आज या अभिनेत्रीकडे कोट्याधींची संपत्ती आहे.
2018 च्या मीडिया रिपोर्टनुसार, काजल अग्रवाल ज्या घरात राहते त्या घराची किंमत तब्बल 7 कोटी रुपये आहे.
काजल अग्रवालच्या एकूण संपत्तीबाबत बोलायचं झालं तर 2018 च्या रिपोर्टनुसार, ती तब्बल 66 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. यामध्ये आता नक्कीच वाढ झालेली असणार यात शंका नाही.