जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Screw Dheela Teaser : करण जोहरच्या बहुचर्चित सिनेमाची पहिली झलक आली समोर, टायगर श्रॉफबरोबर दिसणारी 'पुष्पा' अभिनेत्री अंधारातच

Screw Dheela Teaser : करण जोहरच्या बहुचर्चित सिनेमाची पहिली झलक आली समोर, टायगर श्रॉफबरोबर दिसणारी 'पुष्पा' अभिनेत्री अंधारातच

Screw Dheela Teaser : करण जोहरच्या बहुचर्चित सिनेमाची पहिली झलक आली समोर, टायगर श्रॉफबरोबर दिसणारी 'पुष्पा' अभिनेत्री अंधारातच

करण जोहरनं इन्स्टाग्रामवर त्याचा आगामी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. यामध्ये टायगर श्रॉफ दिसणार असून ही अत्रिनेत्री दिसणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 जुलै : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता टायगर श्रॉफ आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Tiger Shroff and rashmika Mandanna)आगामी प्रोजेक्टवर एकत्र काम करत असल्याच्या बातम्या फिरत आहेत. त्यामुळे एक फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समोर येणार, अशा चर्चा पहायला मिळत होत्या. याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. अशातच निर्माता करण जोहरनं याविषयी एक मोठी घोषणा केल्याचं समोर आलंय. करणनं त्याच्या इन्स्टाग्राम अकांउंटवर याविषयी व्हिडीओ शेअर करत अधिकृत घोषणा केली आहे. करण जोहरनं इन्स्टाग्रामवर त्याचा आगामी  चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या चित्रपटाचं नाव ‘स्क्रू धीला’ ठेवण्यात आले आहे. टायगर श्रॉफ आणि रश्मिका मंदान्ना स्टारर हा चित्रपट असल्याच्या चर्चांदरम्यान करणने हा टीझर प्रदर्शित केलाय. मात्र या टीझरमध्येही रश्मिकाचा चेहरा स्पष्ट झाला नाहीये. त्यामुळे या चित्रपटात रश्मिका खरंच असणार आहे का? याची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. हेही वाचा -    ‘… म्हणून बॉलिवूड सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगले चालत नाही’; फरहान अख्तरनं सांगितलं कारण टीझरमध्ये टायगर एका पी.टी टीचरची भूमिका साकरताना दिसणार आहे. यामध्ये अभिनेत्रीचीही झलक दाखवण्यात आली आहे. मात्र ती अंधारात असल्यानं नक्की कोणती अभिनेत्री असेल असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मात्र बॉडीस्ट्रक्चरवरुन ती रश्मिका असल्याच्याच चर्चा होतायेत.

जाहिरात

‘स्क्रू धीला’ चित्रपटात टायगर वेगळी भूमिका साकारत आहे, त्यामुळे चित्रपटाचे नावही थोडे वेगळे ठेवण्यात आले आहे. या चित्रपटचं शूटिंग भारतात आणि परदेशात झालं आहे. शशांक खेतान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून ह चित्रपट करण जौहर निर्मित आहे.  करण जोहर आणि शशांक खेतानच्या या आगामी प्रोजेक्टमध्ये अभिनेता टायगर श्रॉफसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार हे आता पुढच्या टीझरमधून स्पष्ट होईल असं वाटतंय. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता ही कायमच आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात