मुंबई, 25 जुलै : गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की, बॉलिवूड सिनेमे बॉक्स ऑफिसवर जास्त कमाल दाखवू शकत नाहीत. बाकीच्या सिनेसृष्टीतील तुलनेत बॉलिवूड कुठेतरी मागं पडत चाललंआहे. याविषयी आता अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक फरहान अख्तर (Farhan Akhtar) याविषयी वक्तव्य केलं आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकवेळा आपलं मत मांडताना दिसतो. अशातच फरहाननं आता बॉलिवूड सिनेमांविषयी वक्तव्य केलं आहे. त्यामुळे तो सध्या जोरदार चर्चेत आहे. नेटफ्लिक्ससाठी ‘द ग्रे मॅन’ या अॅक्शन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत आलेल्या फरहांद द रुसो ब्रदर्सशी संवाद साधताना फरहाननं बॉलिवूड विषयी वक्तव्य केलेलं पहायला मिळालं. आजकाल बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास दाखवू शकत नाहीत. चित्रपटांची कथा प्रेक्षकांना प्रभावित करू शकत नाही. त्यामुळे बिग बजेट असो की छोटे बजेट, कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष छाप पाडू शकत नाही. आता बॉलीवूडला सज्ज होण्याचे दिवस आले आहेत कारण हिंदीशिवाय बाकी सिनेसृष्टी चांगलं काम करत आहे, असं फरहाननं म्हटलं. हेही वाचा - Shraddha Kapoor : ‘चहा पिणाऱ्यांसाठी…’; श्रद्धा कपूरची ती पोस्ट चर्चेत , पाहा PHOTO ‘मिस मार्वल’मध्ये काम करण्याचा अनुभव सांगतना फरहान पुढे म्हणाला की, सुपरहिरो ओटीटी मालिका ‘मिस मार्वल’मध्ये काम करणे हा त्यांच्यासाठी एक अद्भुत अनुभव होता आणि लोक सुपरहिरो चित्रपटांचा आनंद घेतात. मात्र हिंदी चित्रपटातील नायक तेच करत आहेत जे सुपरहिरोज करतात. “आमचे हिरो लोकांना मारताना आणि हवेत फेकताना दिसतात.” हॉलिवूड कंटेंटशी स्पर्धा करण्यासाठी हिंदी चित्रपटांना मोठे बजेट नसावं, मात्र तयारी चांगली असावी, असंही फरहाननं म्हटलं. त्यामुळे बॉलिवूड सिनेमांना आणखीन काम करण्याची गरज असल्यातं फरहाननं म्हटलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.