मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मिस युनिवर्स Harnaaz Sandhu वर 'या' प्रकरणी गुन्हा दाखल, 'कपिल शर्मा शो' फेम अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

मिस युनिवर्स Harnaaz Sandhu वर 'या' प्रकरणी गुन्हा दाखल, 'कपिल शर्मा शो' फेम अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

Harnaaz Sandhu

Harnaaz Sandhu

मिस युनिवर्स हरनाज संधू सध्या अडचणींत सापडली आहे. 'काॅमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा' फेम अभिनेत्री उपासना सिंहनं हरनाजवर गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई, 5 ऑगस्ट : मिस युनिवर्स 2021 हरनाझ कौर (Harnaaz Kaur Sandhu) संधू सतत चर्चेत असते. यावेळी हरनाज कौर संधू एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. हरनाज संधू सध्या अडचणींत सापडली आहे. 'काॅमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा' फेम अभिनेत्री उपासना सिंहनं हरनाजवर गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. सध्या हे प्रकरण चिघळत चालल्याचं पहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही हे प्रकरण चांगलंच गाजत आहे.

हरनाज संधू लवकरच ‘बाई जी कुटंगे’ पंजाबी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री उपासना सिंहनं केली आहे. पंजाबी चित्रपटासाठी केलेल्या कराराचा भंग केल्याप्रकरणी उपासना सिंहनं हरनाजवर खटला दाखल केला आहे. खटला दाखल करताना उपसानानं म्हटलं की, ‘बाई जी कुटंगे’ हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार होता, पण हरनाजने तिला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेळ दिला नाही. कॉन्ट्रॅक्टनुसार हरनाजला 25 दिवसांसाठी चित्रपटाचे प्रमोशन करायचे होते, मात्र आता केवळ पाच दिवसच चित्रपटाचे प्रमोशन केले तर चांगले होईल.

हेही वाचा -  Alia Bhatt: आमिर-अक्षय नंतर सोशल मीडियावर Boycott Alia Bhatt का होतंय ट्रेंड?

उपसनान पुढे म्हटलं की, हरनाज संधूसोबत अनेक प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तिनं हरनाजला फोन, मेसेज आणि मेल्सही केले, तरीही तिनं कशाचंच उत्तर दिलं नाही. उपासनानं याप्रकरणी आता न्यायालयात धाव घेतली असून कराराचे उल्लंघन केल्याबद्दल नुकसान भरपाई मागितली आहे. या चित्रपटासाठी मी मोठी रक्कम खर्च केली आहे. हा काही छोट्या बजेटचा चित्रपट नाही, असंही उपासनानं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

दरम्यान, अभिनेत्री हरनाज संधूसोबत उपसाना सिंहचा मुलगा ‘बाई जी कुट्टंगे’ पंजाबी चित्रपटात झळकणार होता. मात्र आता या चित्रपटाच्या अडचणी तर वाढल्याच वाढल्या त्यासोबतच हरनाजच्याही अडचणींत वाढ झाली आहे. हरनाजनं यावर अद्याप मौन सोडलं नाही. त्यामुळे याप्रकरणी हरनाज काय प्रतिक्रिया देईल हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Cases, Entertainment, Panjab, Upcoming movie