जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Kantara: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'कांतारा' वादात; लागला गंभीर आरोप

Kantara: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'कांतारा' वादात; लागला गंभीर आरोप

कांतारा

कांतारा

कन्नड चित्रपट ‘कांतारा’ सध्या प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्तकमाई करत धुमाकूळ घालत आहे. एकीकडे या चित्रपटाची सर्वच स्तरातून प्रशंसा होत असताना. दुसरीकडे काही गोष्टींमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 ऑक्टोबर-  कन्नड चित्रपट ‘कांतारा’ सध्या प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत धुमाकूळ घालत आहे. एकीकडे या चित्रपटाची सर्वच स्तरातून प्रशंसा होत असताना. दुसरीकडे काही गोष्टींमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकतंच एका युजरने चित्रपटातील भूत काला परंपरेला हिंदू संस्कृतीशी जोडल्याबद्दल आक्षेप घेतला होता. त्यावरुन सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला होता. या गोष्टीवरुन सोशल मीडियावर दोन गट पाहायला मिळत आहेत. दरम्यान कांताराचे सर्वच सीन आणि कथा सगळ्यांना चित्रपटाकडे आकर्षित करत आहेत. मात्र आता चित्रपटाच्या निर्मात्यांवर ‘नवरसम’ हे प्रसिद्ध गाणं चोरल्याचा आरोप लागला आहे.केरळच्या एका प्रसिद्ध ‘थेक्कुडम ब्रिज’ या बँडने कन्नड चित्रपटाच्या निर्मात्यांवर आपलं ‘नवरसम’ गाणं मोड-तोड करुन वापरल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे चित्रपट अडचणीत सापडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बँडने दावा केला आहे की, ‘वराह रुपम दैवा वा रिश्तम’ हे गाणं त्यांच्या ‘नवरसम’ गाण्याची कॉपी आहे. कारण कांतारा यांच्या गाण्याची चाल ‘नवरसम’ सारखीच आहे. बँडच्या एका निवेदनात म्हटलं आहे की, “आम्ही आमच्या श्रोत्यांना कळवू इच्छितो की थेक्कुडम ब्रिज कोणत्याही प्रकारे कांताराशी संबंधित नाही. आमच्या आयपी ‘नवरसम’ आणि ‘वराह रुपम’ मधील समानता ऑडिओच्या बाबतीत स्पष्टपणे कॉपीराइटचं उल्लंघन करत आहे. (हे वाचा: Kantara: ऋषभ शेट्टीच्या कांतारानं KGFला टाकलं मागे; बनला दुसरा सर्वात मोठा कन्नड सिनेमा ) ज्या बँडने कांताराच्या निर्मात्यांवर गाणं चोरीचा हा आरोप केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. आणि त्यासंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात म्हटलं आहे की, बौद्धिक मालमत्तेचे उल्लंघन मिटवण्यासाठी कांतारा, होंबळे फिल्म्सच्या निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. याबाबत अद्याप कांतारा निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीय. ते या सर्व प्रकारावर काय उत्तर देतात? सर्वांचं लक्ष लागून आहे.

News18लोकमत
News18लोकमत

‘कांतारा’ या चित्रपटाची कथा 1847 मध्ये सुरु होते. जेव्हा किनारपट्टीवरील कर्नाटकातील एका गावाच्या राजाने स्थानिक देवता, पंजुरीच्या पुतळ्याच्या बदल्यात गावकऱ्यांना चिरस्थायी आनंद आणि शांती मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन दान केली होती. देवाणघेवाण दरम्यान त्याला जंगलातील आत्म्यांनी इशारा दिला की जर राजाने ही जमीन परत मागितली तर देवता त्याला कधीच माफ करणार नाही. मात्र 1970 मध्ये राजाच्या वंशजांना जमीन परत घ्यायची असते. या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आधारित आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात