Home /News /entertainment /

...म्हणून कंगनाची आई आली समोर, पंतप्रधान मोदींसह अमित शहांना दिला हा संदेश

...म्हणून कंगनाची आई आली समोर, पंतप्रधान मोदींसह अमित शहांना दिला हा संदेश

कंगना रणौतचे कुटुंबीय हे काँग्रेस विचारधारेशी जोडलेले आहेत

    मंडी, 10 सप्टेंबर :  अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं समर्थन करीत आली आहे. कंगनानंतर आता तिची आई आशा रणौत यांनी मोदींसाठी एक संदेश दिला आहे.  तिच्या आईचं म्हणणं आहे की, त्यांचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पार्टीशी (Congress) जोडलेले होते. मात्र सद्य परिस्थितीत भाजपने (BJP), मोदी सरकारने त्यांची मदत केली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृह मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री जयराम ठाकुर (CM Jairam Thakur) यांचे आभार व्यक्त करते. आज त्यांच्या घरी भेटीसाठी आलेल्या भाजपच्या लोकप्रतिनिधींकडे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपीच्या आघाडी महाराष्ट्र सरकार विरोधात कंगना रणौत विरोधात केलेल्या कारवाईविरोधात हल्लाबोल केला. हे ही वाचा-कंगना Vs शिवसेना : 24 तासांत CM उद्धव ठाकरेंविरोधात कंगनाची डायलॉगबाजी भाजपच्या या अभियानाअंतर्गत संघटनात्मक जिल्हा सुंदरनगरचे अध्यक्ष दिलीप ठाकूर यांनी पुढाकार घेत भाजप नेत्यांचं एक प्रतिनिधिमंडळ कंगनाच्या घरी तिच्या आईला भेट देण्यासाठी गेले होते. भाजप नेत्यांनी कंगनाची आई आशा रणौतशी भेट घेत त्यांना विश्वासात घेतलं आणि भाजपाचा पाठिंबा असल्याचं आश्वासन दिलं. हे ही वाचा-केवळ कंगना नाही तर शाहरुखसह या कलाकारांच्या बंगल्यावर पडला आहे BMC चा हातोडा भाजप नेत्यांसोबत चर्चेदरम्यान आशा रणौत यांनी सांगितले की त्यांच्या कुटुंबातील सर्व पूर्वज काँग्रेस पक्षासोबत जोडलेले होते. ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे की त्यांचे कुटुंबीय काँग्रेस कुटुंबातील विचारधारेशी जोडलेले आहे. मात्र आज जेव्हा कंगनावर संकट आलं तेव्हा राज्य सरकारने अशा प्रकारे कारवाई केली. त्यानंतर केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि राज्यातील जयराम ठाकूर हे कंगनाच्या मदतीसाठी उभे राहिले. भाजपने त्यांच्या मुलीला सुरक्षा दिली. आशा रणौतने यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचे आभार मानले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Congress

    पुढील बातम्या