जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Emergency First look - Kangana Ranaut इंदिरा गांधी शोभतेय का पाहा, आणीबाणीविषयीच्या सिनेमाचा फर्स्ट लुक आला समोर

Emergency First look - Kangana Ranaut इंदिरा गांधी शोभतेय का पाहा, आणीबाणीविषयीच्या सिनेमाचा फर्स्ट लुक आला समोर

Emergency First look - Kangana Ranaut इंदिरा गांधी शोभतेय का पाहा, आणीबाणीविषयीच्या सिनेमाचा फर्स्ट लुक आला समोर

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranuat) काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आधारित ‘थलाइवी’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आली होती. त्यांनतर आता अभिनेत्री पुन्हा एकदा ‘इमर्जन्सी’ या राजकीयपटात दिसणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 जुलै-  बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranuat)  काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आधारित ‘थलाइवी’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आली होती. त्यांनतर आता अभिनेत्री पुन्हा एकदा ‘इमर्जन्सी’ या राजकीयपटात दिसणार आहे. यापूर्वीच आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की, कंगना देशाच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांनतर आता या चित्रपटातील कंगनाचा फर्स्ट लुक समोर आला आहे.

जाहिरात

कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये अभिनेत्रीने आपल्या आगामी राजकीयपटातील आपला लुक शेअर केला आहे. यामध्ये कंगना इंदिरा गांधींच्या लुकमध्ये दिसून येत आहे. अभिनेत्रीचा या चित्रपटाचं नाव ‘इमर्जन्सी’ असं आहे. कंगनाने इमर्जन्सीमधील आपला फर्स्ट लुक शेअर करत लिहिलंय, ‘जगाच्या इतिहासातील सर्वात ताकदवान आणि विवादित महिलांपैकी एक पॉवरफुल महिला साकारताना’.सोबतच या चित्रपटाचं शूटिंग सुरु झाल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे.

कंगना रणौतने फर्स्ट पोस्टर शेअर करत चित्रपटाचं 53 सेकंदाचं एक टीजरसुद्धा शेअर केलं आहे. यामध्ये कंगना माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या गेटअपमध्ये दमदार संवाद म्हणताना दिसून येत आहे. अवघ्या 35 मिनिटांपूर्वी शेअर केलेल्या या फर्स्ट लुकवर आत्तापर्यंत 28 हजरांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. **(हे वाचा:** ‘थलाइवी’ नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका ) कंगनाने वर्षाच्या सुरुवातीलाचं या चित्रपटाची घोषणा केली होती. तसेच कंगनाने म्हटलं होतं, की हा चित्रपट बयोपिक नसणार आहे. तर हा चित्रपट महत्वाच्या राजकीय घटनेवर आधारित असणार आहे. या चित्रपटामुळे आजच्या पिढीला देशाच्या घडून गेलेल्या आणि पुढच्या राजकीय घटना समजण्यास मदत होणार असल्याचंही तिनं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात