Home /News /entertainment /

‘कंगना म्हणजे न्यूक्लिअर बॉम्ब’; राम गोपाल वर्मांनी ‘ते’ वादग्रस्त ट्विट केलं डिलिट

‘कंगना म्हणजे न्यूक्लिअर बॉम्ब’; राम गोपाल वर्मांनी ‘ते’ वादग्रस्त ट्विट केलं डिलिट

कंगनाची स्तुती करत तिची तुलना चक्क न्यूक्लिअर बॉम्बशी केली होती. मात्र त्यानंतर कंगनासोबत झालेल्या वादामुळं त्यांनी ते ट्विट डिलिट केलं. सध्या याच ट्विटमुळं त्यांच्यावर टीका केली जात आहे.

    मुंबई, 18 फेब्रुवारी : राम गोपाल वर्मा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरातील राजकारण अशा विविध विषयांवर ते रोखठोकपणे आपली भूमिका मांडतात. सध्या ते अभिनेत्री कंगना रणौतमुळे चर्चेत आहेत. अलिकडेच त्यांनी कंगनाची स्तुती करत तिची तुलना चक्क न्यूक्लिअर बॉम्बशी केली होती. मात्र त्यानंतर कंगनासोबत झालेल्या वादामुळं त्यांनी ते ट्विट डिलिट केलं. सध्या याच ट्विटमुळं त्यांच्यावर टीका केली जात आहे. नेमकं काय म्हणाले होते रामगोपाल वर्मा? "मी माझ्या कारकिर्दीत आजवर कुठल्याही कलाकाराचा इतका चांगला क्लोजअप पाहिला नव्हता. या फोटोत कंगनाची ओरिजिनॅलीटी आणि इंटेंसिटी पाहून मी अवाक् झालो. कंगना तू तर खरंच एक न्यूक्लिअर बॉम्ब आहेस." अशा आशयाचं ट्विट करुन राम गोपाल वर्मा यांनी तिची स्तुती केली होती. मात्र कंगनासोबत झालेल्या मतभेदानंतर त्यांनी हे ट्विट डिलिट केलं. सध्या हे ट्विट पुन्हा एकदा चर्चेत आहे. अवश्य पाहा - रेखाच्या BOLD सीनमुळं उडाली होती खळबळ; शेखर सुमन यांचा ‘उत्सव’ पुन्हा चर्चेत कुठल्या मुद्द्यावरुन सुरु झालं भांडण? कंगनानं अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्नस्टार असं म्हटलं होतं. तिच्या या विधानावर राम गोपाल वर्मा संतापले अन् त्यांनी तिला प्रत्युत्तर दिलं. “मला शिवीगाळ सुरु असलेल्या स्पर्धेत उतरायचं नाही. परंतु उर्मिला मांतोंडकर एक अष्टपैलू अभिनेत्री आहेत. रंगीला, सत्या, कौन, भूत, एक हसीना यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी कर्तृत्व सिद्ध केलं आहे.” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं होतं. अन् त्यानंतर कंगना आणि राम गोपाल वर्मा यांच्यात मतभेद सुरु झाले.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Entertainment, Kangana ranaut, Marathi entertainment, Ram gopal varma, Social media, Twitter

    पुढील बातम्या