दाक्षिणात्य प्रेक्षक आपल्या आवडत्या सिनेकलाकारांसाठी फारच भावूक असतात. त्यांच्या आवडत्या कलाकाराचं थेट मंदिर बांधायला देखील ते मागेपुढे पाहात नाही. अगदी एखाद्या देवाप्रमाणे ते आपल्या आवडत्या कलाकाराची मनोभावे पूजा करतात. रजनिकांत, सुर्या, पवन कल्याण, एन.टी. रामाराव यांसारख्या अनेक नामांकित सिनेकलाकारांची मंदिर आहेत. या सुपरस्टार कलाकारांच्या यादीत आता अभिनेत्री निधी अग्रवाल हिचं देखील नाव जोडलं गेलं आहे. निधीच्या चाहत्यांनी तिच्याबाबत आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी एका मंदिराची स्थापना केली आहे. 'व्हॅलेंटाइन्स डे' दिवशी या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटनाचे फोटो निधीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. निधीनं ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर तिनं ‘शिवाय’, ‘मिस्टर मंजू’, ‘स्मार्ट शंकर’, ‘भूमी’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.