Home /News /entertainment /

इंदिरा गांधींची भूमिका साकारताना कंगनाने शेअर केली एक नोट, म्हणाली...

इंदिरा गांधींची भूमिका साकारताना कंगनाने शेअर केली एक नोट, म्हणाली...

कंगना रणौत तिचा आगामी चित्रपट 'एमरजेन्सी' (Emergency movie))मध्ये इंदिरा गांधींची (Indira gandi )भूमिका साकारताना दिसणार आहे.

    मुंबई, 26 जून : आपलं परखत मत मांडणारी आणि नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणारी अभिनेत्री म्हणजे  कंगना रणौत(kangana ranaut). कंगना सतत कोणत्या ना कोणत्या विषयावर बोलत असते. कोणतंही क्षेत्र असो ती तिचं मत मांडायला अजिबात घाबरत नाही. आपल्या स्वभावामुळे ती नेहमीच ट्रोलरच्या निशाण्यावर असते. अशातच कंगनानं तिच्या आगामी चित्रपटाविषयी एक किस्सा सोशल मीडियावर शेअर केलाय. कंगना रणौत तिचा आगामी चित्रपट 'एमरजेन्सी' (Emergency movie))मध्ये  इंदिरा गांधींची (Indira gandi )भूमिका साकारताना दिसणार आहे. कंगनानंच या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. कंगनानं काल इन्स्टाग्रामवर (Kangana insta story) एक स्टोरी शेअर करत  1975 मधील आणीबाणीविषयी चित्रपटातील किस्सा सांगितलाय. जगाच्या अलीकडच्या इतिहासातील या सर्वात नाट्यमय घटना होत्या. आज कशामुळे आणीबाणी जाहीर करण्यात आली आणि त्याचे काय परिणाम झाले. जगातील सर्वात शक्तिशाली स्त्री केंद्रस्थानी होती. ती स्वतःच एका भव्य चित्रपटाला पात्र आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी एमरजेन्सीसह चित्रपटगृहांमध्ये भेटू. हेही वाचा - 'स्वतःसोबत वेळ घालवणं किती महत्त्वाचं...'; प्रिया बापटची नवी पोस्ट चर्चेत दरम्यान, कंगनाचा नुकताच धाकड चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बाॅक्सऑफिसवर जोरदार आपटला. त्यामुळे तिचा 'एमरजेन्सी' हा राजकारणावर आधारित असलेला चित्रपटाचं काय होणार याची चिंता तिच्या चाहत्यांना लागली आहे. 'एमरजेन्सी' चित्रपटांत काय पहायला मिळणार हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. कंगना रणौत 'तेजस', 'मणिकर्णिका रिटर्न्स' आणि 'सीता: द अवतार' या चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्यामुळे आणखी नव्या भूमिकेत कंगनाला पाहता येणार आहे. अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) नेहमीच देश आणि राजकारणाशी संबंधित मुद्द्यांवर जोरदार बोलते. नुकतंच तिनं केंद्र सरकारनं घोषित केलेल्या अग्निपथ योजनेला पाठिंबा दर्शवला आहे. यावरुनही तिच्यावर अनेक कमेंट करण्यात आल्या. अनेकांनी ट्रोलही केलं.
    Published by:Sayali Zarad
    First published:

    Tags: Bollywood, Entertainment, Indira gandhi, Kangana ranaut

    पुढील बातम्या