मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Kangana Ranaut : सुनावणी न करता थेट फासावर.. तुनिषा प्रकणात कंगनाची उडी, PM मोदींना आवाहन, म्हणाली..

Kangana Ranaut : सुनावणी न करता थेट फासावर.. तुनिषा प्रकणात कंगनाची उडी, PM मोदींना आवाहन, म्हणाली..

तुनिषा शर्मा, कंगना रणौत

तुनिषा शर्मा, कंगना रणौत

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने नुकतीच आत्महत्या केली आहे. मालिकेच्या सेटवरच तुनिषाने गळफास घेतला. या बातमीनं सर्वत्र खळूळ उडाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 डिसेंबर : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने नुकतीच आत्महत्या केली आहे. मालिकेच्या सेटवरच तुनिषाने गळफास घेतला. या बातमीनं सर्वत्र खळूळ उडाली आहे. तुनिषा आत्महत्या प्रकरणी तिचा को-स्टार आणि एक्स बॉयफ्रेंड शीझान खानला अडकला आहे. तुनिषाच्या आईनं शीझानवर अनेक गंभीर आरोप करत तिच्या आत्महत्येला तो जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे पोलिसांनी शीझानला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. याप्रकरणात अनेक प्रतिक्रया येत आहेत. अशातच तुनिषा प्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतनंही प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री तुनिषा प्रकरणी अनेकजण आपलं मत मांडत आहेत. आता याप्रकरणात कंगना रणौतनंही उडी घेतली आहे. कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे. कंगना म्हणाली, 'प्रेम लग्न, नातेसंबंध, एखादी प्रिय व्यक्ती गमावणे, एक स्त्री या सगळ्या गोष्टींचा सामना करु शकते. मात्र तिच्या प्रेमप्रकरणात काहीही सहन करु शकत नाही. समोरच्या व्यक्तीसाठी त्या मुलीचे प्रेम हे शोषणाचे फक्त असू शकतं, पण हे त्या मुलीचे वास्तव नाही कारण या नात्यात असलेली दुसरी व्यक्ती फक्त तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण करत असते.'

तुनिषाच्या मृत्यूला हत्या संबोधत कंगनानंं लिहिलं की, "अशा परिस्थितीत तिचा तिच्या समजुतीवर विश्वास बसत नाही, अशा परिस्थितीत तिला जीवन आणि मृत्यू यात काही फरक दिसत नाही कारण जीवन ही फक्त आपली समज आहे आणि जेव्हा तिने त्याचा अंत करण्याचा निर्णय घेतला. तिनं हे एकट्यानं केलं नाही...तो एक खून आहे."

अशा प्रकरणात सुनावणी न करता थेट फाशीची शिक्षा द्यावी, असं आवाहन कंगना रणौतनं आपल्या पोस्टमध्ये केलं आहे. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना आवाहन करते, जसं कृष्ण द्रौपदीसाठी उभा राहिला, जसं राम सीतेसाठी उभे राहिले, आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो की संमतीविना बहुपत्नीत्व आणि महिलांवर अॅसिड हल्ल्यांच्या विरोधात कठोर कायदे करावेत. आणि हो, त्यांचे अनेक तुकडे केले पाहिजेत आणि त्यांना कोणत्याही खटल्याशिवाय फाशीची शिक्षा दिली पाहिजे.

First published:

Tags: Kangana ranaut, Sucide case, Suicide, Tv actress