मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कंगना रणौतला होणार अटक? जावेद अख्तर यांच्याशी पंगा घेणं पडलं भारी

कंगना रणौतला होणार अटक? जावेद अख्तर यांच्याशी पंगा घेणं पडलं भारी

कंगनाला अनेकदा या स्वभावामुळं ट्रोल देखील केलं जातं. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. यावेळी न्यायालयानं तिच्या विरोधात चक्क अटक वॉरंट बजावलं आहे. (defamation case)

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 12 मार्च: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. अनेकदा या स्वभावामुळं तिला ट्रोल देखील केलं जातं. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. यावेळी न्यायालयानं तिच्या विरोधात चक्क अटक वॉरंट बजावलं आहे. (defamation case)

अवश्य पाहा - पत्नी आएशानं एक्स गर्लफ्रेंडला लिहिलं पत्र; जॅकी श्रॉफने सांगितला तो किस्सा

कंगनानं सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्यावर टीका केली होती. या लोकांमुळं सुशांतचा मृत्यू झाला असा खळबळजनक आरोप तिनं केला होता. या प्रकरणी त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. अख्तर यांनी कंगनाविरोधात अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे बदनामी झाल्याची तक्रार केली होती. कंगनावर बदनामी केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो असे अख्तर यांच्या तक्रारीवर अहवाल सादर करताना पोलिसांनी म्हटलं होतं. त्यानंतर न्यायालयानं कंगनाला समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र ती हजर न झाल्याने न्यायालयाने तिच्याविरोधात टक वॉरंट बजावलं. आता कंगनानं देखील अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी बजावलेल्या जामीनपात्र वॉरंटला सत्र न्यायालयात आव्हान दिलं आहे.

First published:

Tags: Crime, Entertainment, Kangana ranaut, Marathi entertainment