मुंबई 11 मार्च: जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) हे बॉलिवूडमधील नामांकित अभिनेते म्हणून ओळखले जातात. 90 च्या दशकात आपल्या रोमँटिक अंदाजानं तरुणींना घायाळ करणारे जॅकी सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. मात्र सोशल मीडियाद्वारे ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. सध्या ते पत्नी आएशा श्रॉफमुळं (Ayesha Shroff) चर्चेत आहेत. दोघांच्या लव्हस्टोरीचा एक किस्सा सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. आएशा जॅकीच्या प्रेमात इतक्या वेड्या झाल्या होत्या की त्यावेळी त्यांना सवतही चालणार होती. (Ayesha wrote a letter to Jackies ex girlfriend) हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 2002मध्ये जॅकी श्रॉफ आणि आयेशा श्रॉफ यांनी अभिनेत्री सिमी ग्रेवाल (RendezvousWith Simi Garewal) यांच्या एका शोमध्ये आपल्या लव्हस्टोरीची ही खास आठवण सांगितली होती. आएशा त्यावेळी 13 वर्षांच्या होत्या. बसमधून उतरताना त्यांची भेट झाली होती. त्यानंतर एका दुकानात पुन्हा एकदा दोघांनी भेट झाली. त्यावेळी जॅकी आएशा यांच्याशी बोलू लागले. त्यांच्या बोलण्याचा अंदाज पाहून आएशा त्यांच्या प्रेमात पडल्या. अवश्य पाहा - ‘स्टार किड्स असणं हा शाप की वरदान?’; घराणेशाहीच्या वादात जान्हवी कपूरची उडी हाच अनुभव सांगताना जॅकी म्हणाले, “तिनं तर माझ्या एक्स गर्लफ्रेंडला पत्र देखील लिहिलं होतं. त्यावेळी मी सांगितलं होतं माझी एक गर्लफ्रेंड आहे अन् ती कामानिमित्त अमेरिकेत गेली आहे. त्यावेळी तिनं माझ्या गर्लफ्रेंडला पत्र लिहून दोघांनी एकाच वेळी लग्न करुया अन् बहिणींसारखी राहूया अशी विनंती केली होती. खरंच मला दोन पत्नी असत्या तर माझं कल्याणच झालं असतं.” यावर आएशा म्हणाल्या, “त्यावेळी मी असं काही केलं होतं यावर माझा विश्वासच बसत नाही. त्यावेळी कुठल्याही परिस्थितीत मला जॅकीसोबत लग्न करायचं होतं. अन् आनंदाची बाब म्हणजे माझी इच्छा अखेर पुर्ण झाली.” आज जॅकी आणि आएशा यांच्या सुखी संसाराला तब्बल 34 वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यांना दोन मुलं आहेत. मोठा मुलगा टायगर श्रॉफ सध्या बॉलिवूडच्या आघाडिच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तर क्रिष्णा देखील सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.