शेरास सव्वाशेर! सलग 2 दिवस कंगना रणौत - दिलजीत दोसांझचं TWEETER WAR

शेरास सव्वाशेर! सलग 2 दिवस कंगना रणौत - दिलजीत दोसांझचं TWEETER WAR

कंगना रणौत (kangana ranaut) आणि दिलजीत दोसांझमध्ये (diljit dosanjh) शेतकरी आंदोलनावरून सुरू झालेला ट्विटरवरील वाद इतक्या टोकाला गेला आहे, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल.

  • Share this:

मुंबई, 03 डिसेंबर : अभिनेत्री कंगना रणौत  (Kangana Ranaut) आणि अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh)  यांचं सोशल मीडियावर शाब्दिक  युद्ध चांगलंच रंगलं आहे. कंगनानं शेतकरी आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यावर नाराजी दर्शवली. त्यावेळी दिलजीत दोसांझनंदेखील कंगनाला टार्गेट केलं होतं. तेव्हापासून त्यांच्यामध्ये Twitter War  सुरू झालं आहे.

दिलजीतनं कंगना रणौतवर टीका करताच कंगनानं त्याला करण जोहरचं (Karan Johar) पालतू असं म्हटलं. यानंतर दिलजीतनं ट्वीट करत कंगनाला तिच्यात भाषेत उत्तर दिलं.

दिलजीत म्हणाला, "तू जितक्या लोकांसोबत काम केलं त्या सर्वांची ती पालतू आहे...? मग तर तुझ्या मालकांची मोठी यादी असेल...?  खोटं बोलून लोकांना भडकवणं आणि भावनांशी खेळणं तर तुला चांगलंच माहिती आहे.

"मी तुला सांगतो हे बॉलिवूडवाले नाहीत पंजाबवाले आहेत. 2  चे 4 नाही 36 ऐकशील", असंही दिलजीत म्हणाला.

कंगना म्हणाली, "ए चमच्या चल, तू ज्यांचं.... काम घेतो, मी त्यांचं रोज वाजवते. जास्त उडू नको. मी कंगना रणौत आहे, तुझ्यासारखी चमची नाही जे खोटं बोलेनं. मी फक्त शाहीनबागवाल्या आंदोलनकर्तीवर कमेंट केली होती, जर कुणी काही आणखी सिद्ध करून दाखवलं तर मी माफी मागेन"

दिलजीत म्हणाला, "बोलण्याची शिस्त नाही तुला... महिला असून दुसऱ्या महिलेला 100-100 रुपये वाली म्हणते. आमच्या पंजाबमध्ये आई आमच्यासाठी देव असते. तुला बोलण्याची शिस्त कुणी लावली नाही का. आपल्या मोठ्यांशी कसं बोलावं हे पंजाबी शिकवतील तुला"

हे वाचा - माइंड इट! रजनीकांतची अखेर राजकारणात एंट्री, 31 डिसेंबरला करणार घोषणा

असे कित्येक तरी ट्वीट दोघांचेही आहेत. दोघांपैकी एकही माघार घेत नाही आहे, त्यामुळे आता हे ट्विटर वॉर कधीपर्यंत सुरू राहिल आणि कुठपर्यंत पोहोचेल काही सांगता येत नाही. कंगनावर दिलजीतशिवाय पंजाबी गायक एमी विर्क आणि हिमांशी खुराना यांनीदेखील निशाणा साधला आहे.

Published by: Priya Lad
First published: December 3, 2020, 7:42 PM IST

ताज्या बातम्या